गावगाथा

*जलसंधारण,पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ; सामाजिक कार्यातून लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जपणाऱ्या दिनकर नारायणकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा*

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक रणधुमाळी

*जलसंधारण,पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ; सामाजिक कार्यातून लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जपणाऱ्या दिनकर नारायणकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा*

गावगाथा विशेष प्रतिनिधी —वळसंग पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला असून, या जागेसाठी प्रबळ उमेदवार म्हणून दिनकर नारायणकर यांचे नाव पुढे येत आहे. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि ग्रामविकास क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या नारायणकर यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जलसंवर्धन आणि वृक्षसंवर्धन क्षेत्रातील योगदानामुळे त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलसंधारण 2.0 या महत्त्वाकांक्षी योजनेत तालुकास्तरीय विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली होती. तसेच जलपुरुष राजेंद्रसिंह यांच्या “चला जाणून या नदीला” या अभियानात त्यांनी धुबधुबी नदी जिल्हा नदी समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळला.

गेल्या दहा वर्षांत ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना नारायणकर यांनी शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी महिला सबलीकरणाचे अनेक उपक्रम राबवले असून, महिलांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

सन 1992 च्या पाणीटंचाई काळात त्यांनी अल्ताफ पटेल, शफिक पटेल, बसवराज दुधगी, काशिनाथ फुलारी, सुनील ठमके यांच्या सोबत पोलीस स्टेशन परिसरातील हातपंप सर्वसामान्यांसाठी खुला करून घेण्यासाठी लढा दिला. त्याचप्रमाणे बसवराज कलशेट्टी, शफिक पटेल, अल्ताफ पटेल यांच्यासह विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वळसंग येथे लाल बोर्ड बसगाड्यांचा थांबा मिळवण्यासाठी आंदोलन केले.

सन 2018 मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यावर नारायणकर यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याची मोहीम राबवली. या मोहिमेद्वारे जीआर सारख्या नामांकित कंपनीला गावासाठी काम करण्यास भाग पाडण्यात आले. यामध्ये सादिक पटेल, रवी कलशेट्टी, वीरेश बागलकोटी, परशुराम चौगुले, पार्श्वनाथ खोबरे, बसवराज दुधगी, संजय मणुरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद सुरपुरे आदींसह प्रतिभा दुधगी, भागीरथी बिराजदार, निलव्वा जिड्डीमनी, बसम्मा मणुरे, मनिषा मणुरे, कल्पना जाधव, सविता घागरे, भारती उपासे या महिला स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.

सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून तलाव खोलीकरणासाठी दोन लाख रुपयांचा निधी महिलांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. याशिवाय सकाळ माध्यम समूहाच्या मदतीने “छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास योजना” अंतर्गत प्रत्येकी 500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.

राजकीय क्षेत्रात दिनकर नारायणकर यांनी माजी मंत्री आनंदराव देवकाते, कै. बसवेश्वर नरोळे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके, भिमाशंकर जमादार, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. संजय गायकवाड आणि माजी पंचायत समिती सदस्य सोनुताई कलशेट्टी यांच्यासोबत काम करून अनुभव मिळवला आहे.

सामाजिक कार्यातली सातत्य, जनतेशी असलेली जवळीक आणि विकासाभिमुख दृष्टीकोन लक्षात घेता दिनकर नारायणकर यांना वळसंग पंचायत समिती गणातून कोणत्यातरी एका पक्षातून उमेदवारी मिळण्याची शक्यता प्रबळ असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button