किरनळ्ळी येथे विद्यार्थी प्रवेश दिनानिमित्त स्पोर्टस साहित्य गणवेश वाटप व स्नेहभोजन
किरनाळी (ता.अक्कलकोट) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर रोजी शाळेत प्रवेश घेतल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत किरनाळी तर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला.
आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत किरनाळी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरनाळी व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्टस गणवेश वाटप करण्यात आले तसेच सर्व मुलांना स्नेहभोजन देण्यात आले.
या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच सौ. संगीता भंडारे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहून मुलांशी संवाद साधला. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रविकांत हुलगणे, श्री. मल्लिनाथ उणदे, श्री. पद्माकर भंडारे, श्री. अरुण भंडारे, श्री. बाळू पांढरे, श्री. रेवप्पा कणमुसे, श्री. सिद्धेश्वर सोनकांबळे, श्री. परमेश्वर उणदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या मुख्याध्यापक सौ. सुरवसे मॅडम, शिक्षक श्री. मनोहर सर, श्री. चौगुले सर तसेच अंगणवाडीतील सौ. पंचशीला सोनकांबळे, सौ. पटेल मॅडम व भोसले मावशी यांच्या सहकार्याने करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले असून गावातील सर्व पालकवर्ग व नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!