गावगाथा

वागदरी ग्रामपंचायतीकडून प्राथमिक शाळांस आधुनिक डिजिटल साहित्य वाटप

साहित्य वाटप

 वागदरी ग्रामपंचायतीकडून प्राथमिक शाळांस आधुनिक डिजिटल साहित्य वाटप

अक्कलकोट तालुका – वागदरी ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आधुनिक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राथमिक शिक्षण अधिक परिणामकारक, आकर्षक आणि तंत्रज्ञानसमृद्ध व्हावे, विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
आज रोजी झालेल्या या साहित्य वितरणामध्ये खालीलप्रमाणे उपकरणांचा समावेश होता :
  • मराठी मुलांची शाळा : ३ एलईडी टीव्ही, १ प्रिंटर
  • मराठी मुलींची शाळा : १ एलईडी टीव्ही, १ प्रिंटर
  • कन्नड प्राथमिक शाळा : २ एलईडी टीव्ही, १ प्रिंटर
  • उर्दू प्राथमिक शाळा : १ एलईडी टीव्ही, १ कॉम्प्युटर, १ प्रिंटर
गावातील सर्व चारही प्राथमिक शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हे साहित्य देण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत डिजिटल कौशल्ये आत्मसात करावीत, ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरांच्या तोडीस तोड शिक्षण घेऊ शकावेत हा ग्रामपंचायतीचा सकारात्मक हेतू यातून दिसून येतो.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच श्री शिवानंद घोळसगाव, उपसरपंच श्री पंकज सुतार, ग्रामसेवक श्री राजकुमार कणमुसे, श्री बागवान सर, श्री हुसेन आमटे तसेच सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शाळांना देण्यात आलेल्या साहित्याचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
डिजिटल पायाभूत सुविधा वाढविण्याच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांसह शिक्षकवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. वागदरी गावाच्या शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button