धनेश अचलारे यांची शिवसेना जिल्हा उपप्रमुखपदी निवड

HTML img Tag
बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
धनेश आचलारे हे गेल्या वीस वर्षापासून राजकारणात आहेत. ग्रामपंचायत सदस्य पासून त्यांचे राजकीय कारकीर्द सुरू झाले. बोरामणी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. सामुदायिक विवाह सोहळा, जनतेसाठी पोलीस ठाणे, दवाखाना, वीज वितरण कंपनी या आदी ठिकाणी ते नेहमीच धावून जातात. त्यांचा जनसंपर्क व्यापक आहे त्यांनी माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासमवेत शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.
त्यांचा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांची पक्षाने सोलापूर जिल्ह्याच्या उपप्रमुख पदी निवड केली आहे यावेळी त्यांना निवडीचे पत्र शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेच्या प्रवक्ता प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे,लोकसभा महिला प्रमुख अनिता माळगे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
चौकट
पक्ष वाढवणार!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून चांगले विकासकामे केली आहेत.माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात तालुक्याचा विकास साधण्याबरोबरच तालुक्यात शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे..
धनेश आचलारे
नूतन जिल्हा उपप्रमुख
शिवसेना
Back to top button
×
No WhatsApp Number Found!