गावगाथा

नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या विजयाने स्विमिंग ग्रुपचा अभिमान वाढला – सचिन किरनळ्ळी

नगरसेवक महेश इंगळे यांचा स्विमिंग ग्रुपच्या वतीने सत्कार.

नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या विजयाने स्विमिंग ग्रुपचा अभिमान वाढला – सचिन किरनळ्ळी
नगरसेवक महेश इंगळे यांचा स्विमिंग
ग्रुपच्या वतीने सत्कार.
(श्रीशैल गवंडी,अ.कोट.दि.३०/१२/२५)
अक्कलकोट नगरपरिषद निवडणूकीत सलग पाचव्या टर्ममध्ये निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या विजयाने स्विमींग ग्रुपचा अभिमान वाढला असल्याचे मनोगत येथील स्विमींग ग्रुपचे सदस्य तथा एच.पी.पेट्रोल पंपाचे मालक सचिन किरनळ्ळी यांनी व्यक्त केले. आज नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या विजयाचे औचित्य साधून स्विमींग ग्रुपच्या वतीने नगरसेवक महेश मालक इंगळे व वाढदिवसानिमीत्त सचिन किरनळ्ळी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन किरनळ्ळी बोलत होते. यावेळी स्विमिंग ग्रुपचे सदस्य प्रथमेश इंगळे, सचिन किरनळ्ळी, संतोष पराणे, बाबा सुरवसे, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, मेजर अमोल माने, अंकुश केत, रमेश कणबुसे, राजू एकबोटे, सुरेश पाटील, दर्शन घाटगे, अरविंद पाटील, तन्मय इचगे, विद्याधर गुरव, रमेश शिंदे, महादेव आडवीतोटे, मल्लिनाथ माळी, संतोष जवळगे, रफिक पठाण, श्रीकांत झिपरे, प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, मधुकर सदाफुले, ज्ञानेश्वर भोसले, व समस्त स्विमिंग परिवार उपस्थित होते.
फोटो ओळ – स्विमींग ग्रुपच्या वतीने
नगरसेवक महेश इंगळे व वाढ दिवसानिमीत्त सचिन किरनळ्ळी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करतानाचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button