वागदरी येथील स्वा. सावरकर सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन
वागदरी – येथील स्वा. सावरकर सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व निवृत्त मुख्याध्यापक चौळ्ळे गुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदान, सामाजिक परिवर्तनातील त्यांची भूमिका व आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास वाचनालयातील वाचक, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांत व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!