गावगाथा

भीमा कोरेगाव येथे अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघाकडून २५ ते ३० हजार अनुयायांसाठी भव्य सेवा उपक्रम

दिनविशेष

भीमा कोरेगाव येथे अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघाकडून २५ ते ३० हजार अनुयायांसाठी भव्य सेवा उपक्रम
पुणे प्रतिनिधी :
एक जानेवारी भीमा कोरेगाव येथे शिवरदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी आलेल्या २५ ते ३० हजार अनुयायांसाठी अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघ, पुणे यांच्या वतीने भव्य सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत अन्नदान, पाणी वाटप, बिस्किटे व ज्यूस वाटप, आरोग्य शिबिर तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राहुल रुही यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून सेवेचे हे दुसरे वर्ष आहे. अक्कलकोट तालुक्याच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राज्यभरातून आलेल्या अनुयायांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या सेवाकाळात हृदयविकाराचा झटका आलेल्या एका रुग्णाचे प्राणही वाचविण्यात आले. अजित शिबिरातील डॉक्टरांनी तत्काळ उपचार करून ॲम्बुलन्सद्वारे रुग्णास रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. तसेच पीएमटी प्रशासन, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वाहतूक नियोजनासाठी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आले. या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रशासन, बार्टी व समाजकल्याण विभागानेही अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघाच्या कार्याचे कौतुक केले आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा. राहुल रुही, अध्यक्ष राम सोनकांबळे, सचिव चंद्रकांत शिंगे बनसोडे, उपाध्यक्ष दशरथ मडीखांबे व राम हाले, कायदेशीर सल्लागार अॅड. विजयकुमार बनसोडे, अविनाश गायकवाड, कार्याध्यक्ष युवा व्याख्याते सागर सोनकांबळे, बसवराज आलमेल, अॅड. महादेव चिकळी, अजित गायकवाड, रमेश वटार, तुकाराम पोटे, शरण शिंगे, अविनाश शिंगे, श्रीकांत मडीखांबे, वैद्यकीय सेवेसाठी डॉ. सुनील गायकवाड व त्यांची टीम, ॲम्बुलन्स सेवेसाठी अविनाश थोरे व नागेश तळकेरी, तसेच सल्लागार विश्वनाथ शिंदे, अनिल शिंदे, नितीन बनसोडे, मुदकु तळकेरी, गौतम बनसोडे, मलकाप्पा तळकेरी, मुतप्पा, भोगेश सोबान, बाबुराव बनसोडे, काशिनाथ बनसोडे, रोहित पंडित, सागर भारत सोनकांबळे आदी शेकडो पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button