श्री. एस. एस. शेळके प्रशालेचा शासकीय रेखाकला परीक्षेत १००% निकाल
वागदरी केंद्राची घवघवीत कामगिरी; १५९ पैकी १५९ विद्यार्थी उत्तीर्ण
वागदरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, वागदरी येथील श्री. एस. एस. शेळके प्रशाला व केंद्राने या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रशालेतून परीक्षेला बसलेल्या एकूण १५९ विद्यार्थ्यांपैकी सर्व १५९ विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी ९३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी A श्रेणीत २०, B श्रेणीत २१ व C श्रेणीत ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी ६६ विद्यार्थी बसले असून, त्यामध्ये A श्रेणीत २६, B श्रेणीत २४ व C श्रेणीत १६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
या घवघवीत यशामागे प्रशालेचे कला शिक्षक श्री. श्रीशैल वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध अध्यापन व विद्यार्थ्यांवरील सातत्यपूर्ण मेहनत कारणीभूत ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत त्यांनी उत्कृष्ट निकाल साध्य करून दाखवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. बसवराज शेळके, सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल देशमुख, पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव, तसेच सर्व शिक्षकवृंद व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!