आदर्श शिक्षकांचा गौरव ; बापूराव नारायण चव्हाण यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास आमदार सचिन कल्याणशेट्टींची उपस्थिती
वागदरी (प्रतिनिधी) अक्कलकोट तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश फुलवणारे आदर्श शिक्षक श्री. बापूराव नारायण चव्हाण यांच्या सेवापूर्तीचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून श्री. चव्हाण सरांचा सत्कार केला. आपल्या मनोगतात त्यांनी चव्हाण सरांच्या चार दशकांहून अधिक कालावधीतील निष्ठावान आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करत, “एक शिक्षक समाजाचा शिल्पकार असतो, आणि चव्हाण सरांनी हा आदर्श प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे,” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी आरोग्य, आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छाही दिल्या.

कार्यक्रमाला श्री. शिवलिंगेश्वर महाराज, श्री. आनंद तानवडे, श्री. प्रशांत आरबाळे, श्री. मागणे साहेब, श्री. प्रदीप जगताप, श्री. श्रीमंत कुंटोजी, श्री. सिद्धेश्वर मठपती, सौ. विद्याताई स्वामी, सौ. स्नेहाताई हन्नुरे, सौ. मुक्ताबाई शिवानंद पटणे, श्री. बसवराज शेळके, श्री. शिवानंद घोळसगाव, श्री. लक्ष्मण सलगरे, श्री. सोमशेखर स्वामी, श्री. लकप्पा पुजारी, श्री. वीरभद्र यादवाड, श्री. सुरेश शटगार, श्री. प्रभाकर टिंगरे, श्री. संगमेश्वर कलशेट्टी, श्री. देविदास वाघमोडे, श्री. धोंडप्पा यमाजी, श्री. बसवराज खिलारे, श्री. काशिनाथ विजापूरे तसेच श्री. दयानंद कवडे सर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी श्री. चव्हाण सरांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या आदर्श सेवेला सलाम केला. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Back to top button
×
No WhatsApp Number Found!