गावगाथा

स्वहस्ते साकारलेल्या शुभेच्छापत्रांतून विद्यार्थ्यांचा पंतप्रधानांशी स्नेहबंध

शैक्षणिक उपक्रम

स्वहस्ते साकारलेल्या शुभेच्छापत्रांतून विद्यार्थ्यांचा पंतप्रधानांशी स्नेहबंध

वाई : भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जॉय चिल्ड्रन्स अकॅडमी, वाई येथील विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेली भेटकार्डे व शुभेच्छापत्रे पंतप्रधान कार्यालय, नवी दिल्ली येथे पाठविण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि कल्पकतेने तयार केलेल्या या शुभेच्छापत्रांमधून त्यांच्या कलागुणांसोबतच देशाच्या आदरणीय पंतप्रधानांविषयीच्या भावना व्यक्त झाल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जॉय चिल्ड्रन्स अकॅडमीच्या वतीने हा उपक्रम सन २०१४ पासून सातत्याने राबविण्यात येत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पनेतून शुभेच्छापत्रे तयार करण्याची संधी दिली जाते. रंग, अक्षरे, चित्रे आणि आकर्षक सजावटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पना या शुभेच्छापत्रांतून साकारल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

केवळ शुभेच्छा व्यक्त करणे एवढ्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून विद्यार्थ्यांमधील कलात्मक दृष्टी, सर्जनशील विचार आणि स्वहस्ते काम करण्याची आवड विकसित करण्यासाठीही तो महत्त्वपूर्ण ठरत आहे. स्वतः तयार केलेले शुभेच्छापत्र देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या उपक्रमामागे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. मनिंद्र कारंडे सर तसेच सचिव व संचालक सौ. मीना मनिंद्र कारंडे मॅडम यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभत आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वहस्ते साकारलेली अक्षरे, रंग आणि चित्रांमधून व्यक्त झालेल्या मनःपूर्वक शुभेच्छा पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव ठरत आहे. कला, सर्जनशीलता आणि देशप्रेम यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या उपक्रमासाठी श्री. वासीम युनुस पिंजारी, कलाशिक्षक, चित्रकला विभाग, जॉय चिल्ड्रन्स अकॅडमी, वाई यांनी विशेष मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button