स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

रसिका सानिकाच्या भक्ती व सुगम संगीताने गुंफले धर्मसंकीर्तनाचे तिसरे पुष्प

रसिका सानिकाच्या संगीतमय भक्तीने वटवृक्ष मंदिरातील उपस्थित भाविकही गहिवरले.

रसिका सानिकाच्या भक्ती व सुगम संगीताने गुंफले धर्मसंकीर्तनाचे तिसरे पुष्प

रसिका सानिकाच्या संगीतमय भक्तीने वटवृक्ष मंदिरातील उपस्थित भाविकही गहिवरले.

प्रतिनिधी अक्कलकोट, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवातील धर्मसंकीर्तन महोत्सवात आज सोलापूरातील सुप्रसिध्द गायिका कु.रसिका व कु.सानिका कुलकर्णी यांच्या भक्ती व सुगम संगीताने धर्मसंकीर्तन महोत्सवाचे तिसरे पुष्प गुंफले. या धर्मसंकीर्तन महोत्सवातील रसिका व सानिकाच्या या भक्ती व सुगम संगीत गायन सेवेने भाविकांच्या मनाचा ठाव घेत
संगीतमय भक्तीने वटवृक्ष मंदिरातील उपस्थित भाविकही गहिवरले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी
रसिका व सानिका कुलकर्णी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यानंतर रसिका व सानिका या गायिकांनी या भक्ती सुगम संगीत गायन सेवेत प्रथम तुला वंदितो, जय जय जग जननी देवी, देव देव्हाऱ्यात नाही, पराधीन आहे जगती, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, अशा प्रकारची सुंदर गाणी उपस्थित स्वामी भक्तांसमोर स्वामींच्या चरणी अर्पण केली. या गायन सेवेतून त्यांनी
भक्तीयुक्त गीत गायन करून अवीट गोडीने भक्तिरसात भाविकांना वत्सलतेच्या भावभक्तीची अनुभूती प्राप्त करून दिली.
या कार्यक्रमात त्यांना तबल्यावर सोलापूरचे अक्षय भडंगे, यश जवळकर व टाळवर अक्कलकोटचे आदित्य जोशी यांनी
सुंदररित्या साथ संगत केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, खंडेराव घाटगे, बाळासाहेब घाटगे, शिवशरण अचलेर, दीपक जरीपटके, मनोहर देगावकर, भीमराव भोसेकर, जयप्रकाश तोळणूरे, श्रीपाद सरदेशमुख, व्यंकटेश पुजारी, महेश मस्‍कले, लखन गवळी, सिद्धार्थ थंब, समर्थ गडकरी, आशिष व्यास, श्वेता शिंदे, सायली पाटील, हेमांगी भावे, अबोली घाटे, देवयानी गाडगीळ, सुरेखा तेली, प्रसाद पाटील आदींसह स्वामी भक्तांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

फोटो ओळ – धर्मसंकीर्तन महोत्सवात भक्ती व सुगम संगीत सेवा स्वामी चरणी अर्पण करताना रसिका व सानिका कुलकर्णी दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button