गावगाथा

स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग – शिक्षणमंत्री केसरकर

आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान स्वामी दर्शनाअंती दीपक केसरकर यांचे भावोद्गार

स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग – शिक्षणमंत्री केसरकर

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी दर्शन घेऊन केसरकर यांनी व्यक्त केले मनोगत

HTML img Tag Simply Easy Learning    

आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान स्वामी दर्शनाअंती दीपक केसरकर यांचे भावोद्गार

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१०/०४/२४) –
(श्रीशैल गवंडी) देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणे यातच जीवनाची धन्यता आहे. त्याकरिता भाविकांनी स्वामीभक्तीत गुंतून स्वामींचे नामस्मरण, मनन, चिंतन करीत राहणे यातच जीवनाचे सौख्य सामावले आहे. स्वामी भक्तीने जीवनाचा अर्थ समजून जीवन सोपे होते, कारण स्वामीभक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग असल्याचे व आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान असल्याचे मनोगत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त पहाटेच्या काकड आरती प्रसंगी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दीपक केसरकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी बोलताना केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ननू कोरबू,
मंदिर समितीचे व्यंकटेश पुजारी, मंदार महाराज पुजारी, गिरीश पवार, संजय पवार, सचिन हन्नूरे, भिमा मिनगले, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button