150 वर्षांनंतरही जगाला ‘बापूं’ची गरज : प्रा.चंद्रकांत पोतदार ,भुरीकवठे ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालय येथे आज गांधी जयंती साजरा..
2 ऑक्टोबर 1991 हा संस्थेचा स्थापना दिवस आज संस्थेला 32 वर्षे पूर्ण झाली म्हणून संस्थेचा वर्धापन दिन देखील साजरा

150 वर्षांनंतरही जगाला ‘बापूं’ची गरज : प्रा.चंद्रकांत पोतदार ,भुरीकवठे ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालय येथे आज गांधी जयंती साजरा..


भुरीकवठे – तालुका अक्कलकोट येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालय येथे आज गांधी जयंती निमित्त महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गांधी जयंती साजरी करण्यात आले.
यावेळी सचिव चंद्रकांत पोतदार मनोगत व्यक्त करताना म्हणाले 2 ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती आहे. यंदा बापूंची 154 वी जयंती (Gandhi Jayanti 2023) साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरात स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. ‘अहिंसा परमो धर्म:’ आत्मसात करून बापूंनी आपल्या हयातीतच या विचाराची ताकद जगाला जाणवून दिली. अहिंसक सत्याग्रहाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान देऊन बापूंनी देशाला आणि जगाला अहिंसेचा विचार पटवून दिला. देशांतील अशांतता आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची खूप जास्त गरज आहे. साधी राहणी, उच्च विचार आणि सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी त्यांची तत्वे आजही जगाला शांततेचा मार्ग दाखवत आहेत.

तसेच 2 ऑक्टोबर 1991 हा संस्थेचा स्थापना दिवस आज संस्थेला 32 वर्षे पूर्ण झाली म्हणून संस्थेचा वर्धापन दिन देखील साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष अप्पासाहेब कलशेट्टी सचिव चंद्रकांत पोतदार संस्थेचे कर्मचारी वाचक सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
