स्त्रियांच्या आरोग्य विषयी खुली चर्चा घराघरात व समाजात होत नसल्याने आरोग्याबाबत स्त्रिया आजही मागासलेपणाचे जीवन जगत आहेत यातून बाहेर पडण्याची काळजी गरज आहे — शांभवीताई कल्याणशेट्टी
ग्लेनमार्क लाइफ सायन्स कंपनीने सोलापूर जिल्ह्यात 34 लाख रुपयाचे सीएसआर फंडातून डिस्पोझर मशीन वाटप करणार आहे

स्त्रियांच्या आरोग्य विषयी खुली चर्चा घराघरात व समाजात होत नसल्याने आरोग्याबाबत स्त्रिया आजही मागासलेपणाचे जीवन जगत आहेत यातून बाहेर पडण्याची काळजी गरज आहे — शांभवीताई कल्याणशेट्टी


🔶अक्कलकोट :(प्रतिनिधी)
*स्त्रियांच्या आरोग्य विषयी खुली चर्चा घराघरात व समाजात होत नसल्याने आरोग्याबाबत स्त्रिया आजही मागासलेपणाचे जीवन जगत असल्याचे खंत महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेचे संचालिका शांभवी कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केल्या.

ते लोकापुरे मल्टीपर्पज हॉल येथे ग्लेनमार्क लाइफ सायन्सच्या वतीने मेतन फाउंडेशनच्या माध्यमातून महिला व किशोरवयीन मुलींसाठी पाच लाख रुपये किमतीचे सॅनिटरी डिसपोजर मशीन मोफत वाटप कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शांभवी कल्याणशेट्टी बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर वेतन फाउंडेशनचे अध्यक्ष अस्थिरोग तज्ञ डॉ.वेंकटेश मेतन, विजयकुमार राठी, आशिष बाहेती, डॉ. प्रियंका पाटील, एस.आर बेलदार, चिदानंद मुस्तारे, श्री लवंगे यांच्यासह आदीजन उपस्थित होते.

स्त्रियांनी वापराव्याचे वस्तू खुल्या पद्धतीने चर्चा घडवून आणल्याबद्दल समर्थ प्रतिष्ठानचे मनापासून आभार व्यक्त करून आगामी काळात समर्थ प्रतिष्ठान महिलाबाबत कोणतेही कार्यक्रम असल्यास विवेकानंद प्रतिष्ठान मोठी सहभाग घेईल अशी विश्वास याप्रसंगी शांभवी कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन म्हणाले, महिला करिता वापरात येणाऱ्या वस्तूंचे संशोधन करून त्या सुलभरीत्या उपलब्ध करून देण्याचे काम मेतन फाउंडेशन करीत असून, महिलांच्या आरोग्य सुधारणा विषयी आणखी कार्यक्रमाचे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. प्रियंका पाटील म्हणाले, महिलांनी मासिक पाळीच्या वेळी पाळाव्याची स्वच्छतेबद्दल विविध गोपनीय माहिती उपस्थित महिला व किशोरवयीन मुलींना दिले.
याप्रसंगी दयानंद बिडवे, संतोष घिवारे, रजाक सय्यद, जगदीश बोलदे, खंडप्पा करकी, जगदीश शेटे, राजू थंब, अरुण शिंदे, बसू नंदीकोले, ननू कोरबू, मच्छिंद्र इंगोले हैबत्ती वंजारी अशोक कलशेट्टी प्रभाकर बंदी छोडे विठ्ठल हेगडे यांच्यासह आदीजन उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक माजी नगरसेवक तथा समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश हिंडोळे यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी तर आभार चिदानंद मुस्तारे यांनी व्यक्त केले.
*चौकट :*
ग्लेनमार्क लाइफ सायन्स कंपनीने सोलापूर जिल्ह्यात 34 लाख रुपयाचे सीएसआर फंडातून डिस्पोझर मशीन वाटप करणार आहे. त्यापैकी पाच लाख रुपये किमतीचे डिस्पोझर मशीन अक्कलकोट तालुक्यात मोफत वितरित करण्यात आले. हे केवळ एक सामाजिक उपक्रम म्हणून महिला व किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे.
– डॉ. व्यंकटेश मेतन
अध्यक्ष, मेतन फाउंडेशन सोलापूर