गावगाथा

छत्रपती ग्रुप व छावा संघटना बार्शी यांच्या वतीने खास महिलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे मोफत आयोजन!

उपक्रम

 

HTML img Tag Simply Easy Learning    

छत्रपती ग्रुप व छावा संघटना बार्शी यांच्या वतीने खास महिलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे मोफत आयोजन!

बार्शी / प्रतिनिधी = छत्रपती ग्रुप आणि छावा संघटना बार्शी यांच्या संयुक्त विद्यामानाने धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित #छावा चित्रपट बार्शी येथे दाखवण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

बार्शी येथील महिलांसाठी हा विशेष शॊ आयोजित करण्यात आला होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा अतुलनीय पराक्रम आणि शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

छावा चित्रपटाला शिवप्रेमींचा प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. एकीकडे या चित्रपटाचे तिकीट मिळवणे अवघड झाले असतानाच बार्शी येथील युवकांनी एकत्र येऊन #छावा सिनेमाचे मोफत शो आयोजित केला होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रसंगी उपस्थित बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री विजय नाना राऊत, उद्योजक दादासाहेब गायकवाड, माजी नगरसेविका विद्या पवार, माधुरी पवार छत्रपती सिनेमाचे मालक दादा राऊत, दीपक धावारे छावा संघटनेचे निलेश भैय्या पवार, प्रवीण पवार, अतिश थोरात, बजरंग पवार, आरिफ काजी, रवी कोळी, सचिन मोरे, सचिन गोडगे, हनुमंत पवार, शंकर जाधव, जुगल दोडमनी आदी उपस्थित होते.

चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत असून संभाजीराजेंची भूमिका त्यांनी अक्षरशः जिवंत केल्याच्या प्रतिक्रिया शिवप्रेमी देत आहेत.

चित्रपट पाहताना हर हर महादेवच्या घोषणा त्याच बरोबर अंगावर शहारे आणणाऱ्या शिवगर्जनांनी छत्रपती सिनेमागृह दणाणून निघाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button