गावगाथा

धरित्री विद्यालयात शिक्षण सप्ताह निमित्त वृक्षारोपण  

शिक्षण सप्ताह

धरित्री विद्यालयात शिक्षण सप्ताह निमित्त वृक्षारोपण  

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

नळदुर्ग —  येथील ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळदुर्ग संचलित  विद्यालयात आज शिक्षण सप्ताह निमित्त विद्यार्थी व शिक्षक यांनी वृक्षारोपण केले.शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक सदस्य यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्रात्त सुनील पुजारी रक्तदाते आजपर्यत ८० वेळारक्तदान केले.,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थी व माता पालक यांच्या नावाच्या फलकासह एकत्रित वृक्षारोपण करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेल्या परस बागेची पाहणी केली. यानंतर इको क्लब अंतर्गत वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या.सर्वप्रथम विभाग प्रमुख जगताप गोरख यांनी ईको क्लब ची माहिती व महत्त्व मुलांना सांगितले.तसेच सर्व समित्या,त्यांचे स्वरूप व त्यांचे कार्य याची ओळख मुलांना करून दिली. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक सातलगावकर यांनी मुलांना ऊर्जा संवर्धन, जलसंधारणाचे महत्त्व सांगितले व समिती सदस्यांनी कोणकोणते उपक्रम घ्यायचे याची थोडक्यात ओळख करून दिली. यामध्ये ऊर्जा संवर्धन समिती, जलसंधारण समिती, कचरा व्यवस्थापन समिती, प्लास्टिक व्यवस्थापन समिती व परसबाग निर्मिती समिती अशा सर्व समित्या स्थापन करण्यात आल्या. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षकांनाही विविध समितीत सदस्य म्हणून घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कारंजे यांनी केले तर आभार चव्हाण रमेश यांनी मानले. यासाठी मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button