गारपीट अवकाळीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून मदत करा. युवा नेत्या शितल म्हेत्रे यांची मागणी.
अक्कलकोट महिला काँग्रेसच्या अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना दिले आहे

गारपीट अवकाळीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून मदत करा. युवा नेत्या शितल म्हेत्रे यांची मागणी.

कुरनूर दि.२१ संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे किंवा ज्या भागात गारपीट झाले आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी मागणी अक्कलकोट महिला काँग्रेसच्या अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना दिले आहे. खरंतर सलग दोन दिवस अक्कलकोट तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. त्यामध्ये द्राक्ष, टरबूज, पपई, यासारख्या फळबागांना याचा मोठा फटका बसला आहे. तर या हंगामातील ज्वारी, गहू ,हरभरा, या रब्बी पिकांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा निसर्गाने संकट निर्माण केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर आपण काढला पाहिजे आणि त्यांना आर्थिक धीर दिला पाहिजे. त्यामुळे अधिक वेळ न जाता तात्काळ अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिरसट यांची भेट घेऊन म्हेत्रे यांनी निवेदन दिले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष बसवराज अलोली युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुबारक कोरबु, लाला राठोड, विश्वनाथ हाडलगी, शिवशरण इचगे अल्लिबाशा आत्तर,मतीन पटेल, रामचंद्र समाने काशिनाथ कुंभार, वसंत देडे, राहुल बकरे,विकी कोरे, मंगेश फुटाणे,बबन पवार आदी शेतकरी उपस्थित होते.
