गावगाथाग्रामीण घडामोडीठळक बातम्या
Akkalkot Rural : गावगाथा impact..! गावगाथा ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची प्रशासनाकडून दखल ; श्वास गुदमरत असलेल्या वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तात्काळ साफसफाई
अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडी-झूडपे वाढलेली होती. यासंबंधीची बातमी गावगाथा ने प्रसिद्ध केली होती.
या बातमीची दखल घेत संबंधित प्रशासनाकडून तात्काळ स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात ही झाडी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. त्यामुळे जणू आरोग्य केंद्राचाच श्वास गुदमरल्याचा भास होत होता.
दरम्यान, आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष साफसफाई कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.