गेल्या ७० वर्षापासून अक्कलकोट खेडगी परिवाराची धर्मकार्य आणि प्रसादवाटपाची परंपरा
तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथे आज श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त खेडगी परिवाराच्या वतीने 1100 साधू संतांना अन्नदान ,वस्त्र व चादर वाटप करण्यात आले.

गेल्या ७० वर्षापासून अक्कलकोट खेडगी परिवाराची धर्मकार्य आणि प्रसादवाटपाची परंपरा…..

तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथे आज श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त खेडगी परिवाराच्या वतीने 1100 साधू संतांना अन्नदान ,वस्त्र व चादर वाटप करण्यात आले.

अक्कलकोट मध्ये “दानशूर” हा शब्द “खेडगी” परिवाराशी जोडला गेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दानधर्म, अन्नदान, धर्मकार्य, समाजकार्य यामध्ये हा परिवार अखंडपणे कार्यरत असलेला पहायला मिळतो. दानशूर शिक्षणमहर्षी कै. चनबसप्पा खेडगी साहेबांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांचे पुत्र कै.शिवशरणजी खेडगी साहेब यांनी ही हीच परंपराअखंड पणे सुरू ठेवली होती त्यांचाच वसा घेऊन अक्कलकोट नगरीच्या मा नगराध्यक्षा श्रीमती शोभाताई शि.खेडगी यांनी मोठ्या नेटाने पुढे घेऊन जात आहेत व त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष व अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन मा.श्री बसलिंगप्पा शि.खेडगी आणि नातवंडांना देखील या परंपरेला कृतीतून पुढे नेण्याचा धडा देत आहेत. संपूर्ण खेडगी परिवार या पुण्यकर्मात स्वतःला झोकून देऊन कार्यमग्न असल्याचे पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त प्रसाद वाटपाची तयारी सुरु आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रसादवाटप करण्याच्या या धर्मकार्यातून माणसं जोडण्याच्या आणि संस्कृती-परंपरेला पुढे नेण्याच्या या निरपेक्ष भावनेने होत असलेल्या पुण्यकर्माला सलाम …
