Akkalkot station ; वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस ; दरवर्षी वृक्षारोपणानेच वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प या ग्रामपंचायत सदस्यांनी केला
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट स्टेशन : अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी ग्रामपंचायत सदस्य रोहित भालेराव यांनी आपला ३१ वा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला. तसेच प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्याचा यावेळी संकल्प केला. झाडे जगविण्याकरिता संगोपनाची जबाबदारीही यावेळी घेण्यात आली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
ग्रामपंचायत सदस्य रोहित भालेराव यांनी स्वखर्चाने जेऊरवाडी ग्रामपंचायत बाजूला फणस,जांभूळ,अशोक, केशर आंबे याची झाडे लावले,झाडांना सुरक्षा करिता जाळी लावून झाडांना ड्रीप द्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी तंटामुक्त अध्यक्ष श्रीमंत राठोड, पोलीस उपनिरीक्षक बाबू राठोड,उपसरपंच वृषाली भालेराव, पोलीस पाटील विजय चव्हाण, ग्रा स रोहित भालेराव, संजय राठोड,मनोहर जाधव, ग्रां स विजय भालेराव, प्रताप चव्हाण, नामदेव राठोड,काशिनाथ राठोड, नंदराम चव्हाण, हरिश्चंद्र राठोड, रामू पवार,विजय राठोड, सुभाष चव्हाण, संतोष जाधव आदी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)