Akkalkot Rural : अनंत चैतन्य प्रशालेत छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

अक्कलकोट (प्रतिनिधी): सामाजिक परिवर्तनाचे जनक, शिक्षणप्रेमी, दलितोद्धारक, समतेचे प्रणेते, लोकनायक राजा छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आज महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य श्री. अशोक साखरे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर प्रशालेच्या विद्यार्थिनी कु.शिवानी बाळशंकर, कु. लक्ष्मी धर्मसाले, कु.श्रृती बाळशंकर, कु. संगिता धर्मसाले यांची सुंदर भाषणे झाली. या प्रत्येकांचे क्वायर वही देऊन प्रोत्साहनपर कौतुक करण्यात आले. व प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. शहाजी माने यांनी ” छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी मार्गदर्शन केले. गोरगरीब , दीनदलित, शोषित, उपेक्षितांचा आधार बनून सामाजिक समता स्थापित करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य शब्दातीत करण्यापलीकडे आहे, असे प्रतिपादन करुन अशा या दृष्टया राजाला संस्थेचे अध्यक्ष व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूर चे उपसरपंच व युवा नेते सागर कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, सेमी विभाग प्रमुख सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी ,जेष्ठ शिक्षक ज्ञानदेव शिंदे समस्त शिक्षक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पासाहेब काळे यांनी केले व सुत्रसंचालन सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी केले तर आभार सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांनी मानले.
