मिनी गोल्डन गँग‘ सक्रीय झाल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या निवडणूक लागल्या : सिद्रामप्पा पाटील
८५ वर्षीय सिद्रामप्पा पाटील यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची साथ

मिनी गोल्डन गँग‘ सक्रीय झाल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या निवडणूक लागल्या : सिद्रामप्पा पाटील

अक्कलकोट*, दि. १० : (प्रतिनिधी)
*स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट व दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लावण्या करिता ‘मिनी गोल्डन गँग’ सक्रिय झाल्यानेच निवडणूक लागलेली असून, शेतकर्यांच्या मंदिराची निवडणूक लावणार्यांना हद्दपार करा अशी भीम गर्जना ८५ वर्षीय माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी आवाहन केले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची साथ लाभत आहे.*

ते सोमवारी प्रमिला पार्क येथील लक्ष्मी नम: या निवासस्थांनी साखर कारखाना, व बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने साखर कारखाना सभासद, ग्रामपंचायत सदस्य व सहकारी संस्थेचे संचालक यांच्या करिता मतदार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सिद्रामप्पा पाटील हे बोलत होते.

दरम्यान श्री स्वामी समर्थांचे प्रतिमेचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते स्वामीरावकाका पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी, अप्पू परमशेट्टी, सिध्दप्पा गड्डी, अप्पासाहेब बिराजदार, जयशेखर पाटील, संजीवकुमार पाटील, अप्पासाहेब पाटील, सुनील बिराजदार, गिरमल गंगोडा, भिमाशंकर धोत्री, शिवपुत्र धानशेट्टी, दिलीपराव पाटील, महादेवराव पाटील, बाबूशा करपे, डॉ. शिवशरण काळे, शिवशरण जोजन, राजेंद्र बंदिछोडे आदीजण उपस्थित होते.

पुढे बोलताना सिद्रामप्पा पाटील म्हणाले की, गत बाजार समितीच्या सभापती व संचालकांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे. शेतकर्यांच्या हितार्थ संचालक मंडळ कार्यरत होते. पुढे देखील राहिल, असे सांगून अक्कलकोट व दुधनी बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल-तोलार मतदारांनी सज्ज व्हावेत.

साखार कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत असताना काही जागांवर निवडणूक लावून सहकारात राजकारण आणल्याचा आरोप पाटील यांनी करून गेल्या ६५ वर्षापासून सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्यरत असून, गेल्या ५० वर्षात सहकार क्षेत्रात कार्यरत असताना शेतकरी हा केंद्र बिंदू माणून कार्यरत राहिलो आहे.
माझ्या जीवनात अनेक राजकिय चढ-उतार आले, जिव घेणे हल्ले झाले, मात्र श्री स्वामी समर्थांचा व तालुक्यातील तमाम शेतकर्यांच्या आशिर्वादाने आज जीवंत आहे असे सांगून, माझ्या बाजार समिती सभापती पदाच्या काळात अक्कलकोट बाजार समितीला व्यापक स्वरूप आणून त्या काळात बाजार समिती बसवेश्वर यार्डाच्या भव्य जागेत स्थलांतरीत करून एकाच ठिकाणी व्यापार, प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे राज्यातील पहिली बाजार समिती ठरली.
त्यानंतर अनेकांना सभापती केलो, विकास कामे मोठ्या प्रमाणा करण्यात आल्याचे सांगून, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकाळात अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील गावे,वाड्या, वस्त्या, तांडे यासह हम रस्त्यांना कोट्यावधीचा निधी आणण्यात आला, अजून देखील ते आणत आहेत.
मतदार संघाच्या चौफेर विकासासाठी सतत कार्यरत असणारे नेतृत्व म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या व माझ्या नेतृत्वाखाली सहकारातील या निवडणूक होत आहेत. तरी या तिन्ही संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी शेतकरी, कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावेत असे आवाहन सिद्रामप्पा पाटील यांनी करून तालुक्यातील विरोधकांच्या बाबातीत खरपोच समाचार घेऊन सडेतोड आपल्या शब्दात त्यांनी विचार व्यक्त केले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी पुढे बोलताना म्हणाले की, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही मला का तुला संधी यामध्ये निवडणूक लागलेली असून अक्कलकोट बाजार समिती व कारखान्याची निवडणूक विरोधकांनी लावून फायरिंग सेफ करण्याचा प्रयत्न केला आहे. युध्दाच्या आगोदर करण्यात येणारी ही क्रिया आहे. या माध्यमातून दुधनी बाजार समिती ही विरोधक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची मनसुबे आहेत.
ही उधळण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता या तिन्ही सहकारी संस्थेवर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व माझ्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सजग राहावेत असे सांगून कल्यणशेट्टी यांनी दुधनी बाजार समिती निवडणूक करिता सिद्रामप्पा पाटील यांना अक्कलकोट बाजार समिती व कारखान्याची निवडणूक लावून गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अशा या तिन्ही निवडणूकीच्या दरम्यान विरोधक अफवा पसरविणे, गैरसमज निर्माण करणे आदी प्रकारे कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होईल याकडे दुर्लक्ष करून या तिन्ही संस्थेवर भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे.
यावेळी अप्पासाहेब बिराजदार व संजीवकुमार पाटील यांनी साखर कारखाना व बाजार समितीची निवडणूक लादणार्या विरोधकांवर तोफ डागत बिराजदार यांनी साखर कारखाना व बाजार समितीच्या कारभाराबाबत विरोधकांची टिका बिनबुडाची असल्याचे सांगून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार्या तिन्ही संस्थेच्या निवडणूकीत शेतकरी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन बिराजदार यांनी केले.
तर संजीवकुमार पाटील यांनी बाजार समितीचा सभापती म्हणून शेतकरी व व्यापारी, हमाल-तोलार यांच्या हितार्थ केलेल्या कामाबाबत माहिती सांगून विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे नाचता येईना आंगण वाकडे असे असल्याचा आरोप संजीवकुमार पाटील यांनी केले.
यावेळी पुढे बोलतना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोपानकाका निकते यांनी सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या तिन्ही संस्थेच्या निवडणूकीत त्यांनी देतील त्या उमेदवारांना भरघोष मतानी विजय करण्याचे आवाहन करून विरोधकांच्या कार्यप्रणालीवर कडाडून टिका निकते यांनी केले.
*चौकट :*
*८५ वर्षीय सिद्रामप्पा पाटील यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची साथ :*
गेल्या अनेक वर्षापासून सहकारात सिद्रामप्पा पाटील हे कार्यरत आहेत. शेतकर्या करिता आजवर त्यांनी केलेल्या कामामुळेच तालुक्यातील सहकारात ते यशस्वी झाले. ते नेहमी म्हणतात शेवटच्या श्वासां पर्यत शेतकर्यांची सेवा करणार! युवक आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सहकारात त्यांना साथ देत असल्याने भाजपाचे सर्वच कार्यकर्ते व शेतकरी बांधव या निवडणूकीच्या निमित्ताने या तिन्ही संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी वज्र मूठ बांधली आहेत.
याप्रसंगी धनराज बिराजदार, सुधीर मचाले, सिध्दाराम बिराजदार, दिलीपराव शावरी, गुणवंत धर्मसाले, संजीव पाटील, अभिजीत सवळी, स्वप्नील बिराजदार, नागनाथ व्हनमुर्गे, गुरू पाटील , शिवानंद पेडसंगे, मल्लिनात ढब्बे, मलकण्णा जनगोंडा, बसवराज कलशेट्टी, भीमाशंकर विजापुरे, अप्पाशा किवडे, अशोक वर्दे, बाबासाहेब पाटील, श्रीमंत मनगुंदी, महादेव रोडगे, श्रीमंत कुंटोजी, बाबू कॅर, लक्ष्मीबाई पोमाजी, मल्लिनाथ उणदे, शेकप्पा कलघुटगे, महेश धर्मसाले, गोटू मंगरूळे, महादेव महाजन, श्रीशैल मंगरूळे, प्रकाश पोमाजी, मल्लिनाथ भासगी, राहूल काळे यांच्यासह साखर कारखाना सभसाद, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी, पंचकमेटी अध्यक्ष आदीजण बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचलन मल्लिनाथ दुलंगे यांनी केले. तर आभार भिमाशंकर विजापुरे यांनी मानले.