गावगाथा

आयुष्य जगण्यासाठी वडीलांची सोबत महत्वाची -गणेश महाराज वाघमारे

आयुष्य जगण्यासाठी वडीलांची सोबत महत्वाची -गणेश महाराज वाघमारे

आयुष्य जगण्यासाठी वडीलांची सोबत महत्वाची -गणेश महाराज वाघमारे

(अहमदनगर प्रतिनिधी, संतोष शिंदे दि.२२)

जिवनात प्रामाणिकपणा आणि नम्रता हे गुण खूप महत्त्वाचे आहे.आयुष्य जगण्यासाठी वडीलांची दौलत नाही तर वडीलांची सोबत ही खुप महत्वाची आहे.चांगल्या वाईटाची समज ही आपल्याला आई वडीलांकडून मिळालेली असते.असे प्रतिपादन गणेश महाराज वाघमारे (ओझरकर) यांनी स्व.सुभाष साळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित किर्तन रूपी सेवेप्रसंगी ते बोलत होते.

     वाघमारे महाराज म्हणाले.चांगल्या विचारांची कास धरा.आई वडीलांची मान उंचावेल अशी कामगिरी करा.त्यांना दुखवु नका.पैशाने जगात सर्व काही मिळेल.परंतू आई वडील मिळणार नाही.आई वडीलांची सेवा करा .काहीच कमी पडणार नाही.त्यांचे उपकार आहेत.त्यांच्या उपकाराची परतफेड करा.त्यांच्या कडे दुर्लक्ष करू नका.मोठ्या पुण्याईने आईबाप मिळतात.असेही त्यांनी सांगितले.

          यावेळी युवा उद्योजक सचिन कातोरे,बेलवंडी सरपंच ऋषिकेश शेलार, शंकरराव पाडळे माजी पंचायत समिती सभापती श्रीगोंदा,सुनिल ढवळे समता पतसंस्था चेअरमन, बाबुराव चव्हाण ,पिंपळसुटी सोसायटी चेअरमन , तसेच उक्कडगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button