स्वतःला सकारात्मक बनवण्याची ताकद मनामध्येच : दिलीप स्वामी
वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/04/FB_IMG_1682001829303-780x470.jpg)
स्वतःला सकारात्मक बनवण्याची ताकद मनामध्येच : दिलीप स्वामी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
सोलापूर : अध्यात्म, श्रद्धा म्हणजे केवळ पूजाअर्चा नसून मानवसेवा ही खरी ईश्वरभक्ती आहे. सध्या केवळ मार्कांकडे समाजाचे लक्ष आहे. मात्र वाचनसंस्कृती वाढवणे गरजेचे आहे. जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. संत साहित्यात, अध्यात्मात याची शिकवण आहे. स्वतःला सकारात्मक बनवण्याची ताकद मनामध्येच आहे. त्यासाठी इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही. मनाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन व्याख्याते तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘जगण्याची सकारात्मक शैली या विषयावर गुंफताना ते बोलत होते. यावेळी मंचावर धर्मादाय उपायुक्त सुनिता कंकणवाडी, नायब तहसीलदार तृप्ती पुजारी, इंडियन मॉडेल स्कुलच्या संचालिका सायली जोशी, पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे, डॉ. अग्रजा चिटणीस, मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंह पवार, माधुरी बिराजदार, आशा पाटील, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री स्वामी म्हणाले की, सध्याच्या युगात मोबाईल आणि सोशल मीडिया यामुळे वाचन आणि श्रवण कमी झाले आहे. मात्र काही दर्दी श्रोत्यांसाठी वीरशैव व्हिजनने आयोजित केलेली बसव व्याख्यानमाला स्वागतार्ह आहे.
यावेळी व्याख्यानकेसरी बसवराज शास्त्री, प्रा. भीमाशंकर बिराजदार, ऍड. पाटील, वैजनाथ हत्तुरे, विद्यानंद स्वामी, सचिन जाधव, दशरथ वडतिले, डॉ. सुप्रज्ञा शेटे, डॉ. शामा काडादी,
आदी उपस्थित होते.
यावेळी महावितरणचे अभियंता चंद्रकांत दिघे, नाट्य परिषदेवर निवडून आलेले विजयकुमार साळुंखे, राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक श्रीकांत शेटे, साक्षी हौदे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी आशा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी तर आभार साक्षी हौदे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेणुका सर्जे, दिपा तोटद, संजय साखरे, आनंद दुलंगे, शिवानंद सावळगी, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, विजयकुमार हेले, शिव कलशेट्टी, अविनाश हत्तरकी, सचिन विभूते, बसवराज जमखंडी, सोमनाथ चौधरी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर कोरे यांनी परिश्रम घेतले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेप्रसंगी दिलीप स्वामी, सुनिता कंकणवाडी, तृप्ती पुजारी, सायली जोशी, डॉ. अग्रजा चिटणीस, अजयसिंह पवार, माधुरी बिराजदार, आशा पाटील, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)