Akkalkot: अमोलराजे भोसले मित्र परिवाराच्या वतीने सोलापूर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सत्कार

अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट शहर व तालुका अखंड मराठा समाज बांधव व अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूर येथे सत्कार करण्यात आला.


मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे सोलापूर येथील शांतता रॅलीसाठी आले असता, अक्कलकोट शहर व तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार करण्यात आला.


दरम्यान तालुक्यातून हजारो अखंड मराठा समाजबांधव सोलापूर येथील शांतता रॅलीसाठी सहभागी झाले होते. अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने १ लाख फूड पाकीट आणि पाणी बॉटल सोलापूर रॅलीत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सोलापूरचे अमोलबापू शिंदे, मनोज निकम, शीतल जाधव, वैभव नवले, प्रविण देशमुख, सिध्देश्वर मोरे, निखील पाटील, गोटू माने, वैभव मोरे, आकाश शिंदे यांच्यासह अक्कलकोट शहर व तालुका अखंड मराठा समाज बांधव व माता भगिनी बहुसंख्याने उपस्थित होते.