गावगाथा

*नागणसुर कन्नड शाळेतील मुलींनी सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना राखी पाठवून देशभक्तीची जाणीव करून देत रक्षाबंधन साजरे केले.*

रक्षाबंधन विशेष

*नागणसुर कन्नड शाळेतील मुलींनी सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना राखी पाठवून देशभक्तीची जाणीव करून देत रक्षाबंधन साजरे केले.*
*अक्कलकोट:-*
आज सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटरवर शुभेच्छा पाठवून आभार मानणाऱ्या या आभासी जगामध्ये रममाण झालेल्या लोकांमध्ये नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली शाळेतील मुलींनी स्वतःच्या गावापासून हजारो किलोमीटर दूरवर राहून आपल्या भारत देशाचे सीमेच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांना राखी आणि भावनिक पत्रे पाठवून माणुसकी दाखवली आहे.
होय, आजच्या आभासी जगात स्वतःचे, नातेवाईक सर्व काही विसरून स्वार्थ जीवन जगत असताना त्याला फाटा देत कन्नड शाळेतील मुलींनी आपल्या भारत देशाचे विर सैनिकांना त्यांच्या भावना शेअर केल्या. सैनिकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करत त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करूनरक्षाबंधन सण साजरा केले.
शाळेतील विषय शिक्षक शरणप्पा फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलींनी सुमारे 500 राख्या स्वत: बनवून देशाच्या सैनिकांची माहिती घेऊन सैनिकाबद्दल असलेल्या प्रेम व्यक्त करत राख्या पाठवून एक नवा आदर्श निर्माण केले आहे. यामुळे गावातील पालक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख
मुख्याध्यापक व शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापक श्रीशैल दोडमनी, कल्लय्या गणाचारी, शांता तोळनुरे,राजशेखर खानापुरे, राजशेखर कुर्ले, लक्ष्मीकांत तळवार व शरणप्पा फुलारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गंगाधर भोसगी, बसवराज तेग्गीनकेरी, गुरुबाई प्रचंडे व इतर सदस्यांनी सहकार्य केले.

चौकट 1:- आमच्या शाळेतील शिक्षक शरणप्पा फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेत सुमारे 500 राख्या बनवल्या आणि त्या भारत मातेची रात्रंदिवस सेवा करणाऱ्या सैनिकांना आम्ही पाठवली.
सारिका नरुणे विद्यार्थिनी
इयत्ता – सातवी

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट 2-
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी शाळेचे शिक्षक शरणप्पा फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन उपक्रम राबवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या आणि पत्र पाठवून आदर्श निर्माण केलं आहे.खूप आनंद होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रीशैल दोडमनी
मुख्याध्यापक

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट 3 – नागणसुर गावातील श्री.बसवलिंग महास्वामीजी कला, क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने मुलांमध्ये राष्ट्रभावना रुजविण्याच्या उद्देशाने मुलींच्या सहकार्याने 500 राख्या बनवून सैनिकांना पाठवून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा केल्याचे आनंद आहे .
सोमशेखर कोनापुरे
अध्यक्ष
श्री.बसवलिंग महास्वामी कला, क्रीडा, शिक्षण मंडळ नागणसुर

फोटो ओळ 1:-भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम, आपुलकी आणि भावनांची पत्रे पाठवून राष्ट्राभिमान आणि देशभक्ती जागृत करून सुमारे 500 राख्या पाठवण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button