
सिध्दराया दुलंगे यांच्या आत्मकथनाचे थाटात प्रकाशन
———————————————
“अनुभवाची शिदोरी पुढच्यांना प्रेरणादायी”

—- प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार
सोलापूर दि.३१–थोरा मोठ्यांचे अनुभव, भोगलेल्या यातना जिद्द आणि चिकाटी या जोरावर समाजा समोर आदर्श निर्माण करणारी काही व्यक्तिमत्वे असतात. अशा कर्तृत्ववान माणसामुळे समाजात होकारात्मक उर्जा निर्माण होत असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला वेगळा ठसा निर्माण करणारे ,सहकार क्षेत्रात पस्तीस वर्षे सेवा बजाऊन प्रामाणिक कामामुळे पाच वेतनवाढ मिळविणारे आदर्श अधिकारी म्हणून सिध्दराया दुलंगे यांचा आदर्श पुढच्या पिढीला मार्गदर्शन करेल असा विश्वास वाटतो.
असे भावपूर्ण विचार प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी वीरशैव सेवा मंडळ सोलापूर आयोजित सिध्दराया दुलंगे यांच्या आत्मकथनाचे उद्घाटन प्रसंगी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा.डॉ.एस.जे आवटे यांनी आत्मकथनाचे महत्व व वेगळेपण विशद केले. या प्रसंगी प्रा.प्रभाकर हंजगे यांनी दुलंगे यांचा चपळगाव ते आजपर्यंतचा खडतर प्रवासातील निर्मळ जगणे कसे होते याचा उहापोह केला.संगमेश्वर बिराजदार, अरविंद लोणी यांनी मनोगत व्यक्त केले.
वीरशैव सेवा मंडळाच्या वतीने सिध्दराया दुलंगे. यांचा सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना सिध्दराया दुलंगे यांनी आई वडिलांनी केलेल्या संस्कारांनी आपण कसे घडलो,आणि आपण समाजासमोर आदर्श कसा निर्माण करावा हे जाणीव पूर्वक ठरविले असल्याचे सांगितले. समाजाचे उपकार फेडण्यासाठी प्रामाणिक काम करण्याचा सल्ला देऊन आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश लोणी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीशैल शिळ्ळे यांनी मानले. कार्यक्रमास संगमेश्वर पायमल्ले, शिवानंद खैराटे, परमेश्वर बेळमगी,संगमेश्वर बिराजदार, अरविंद लोणी,प्रा प्रभाकर हंजगे,प्रिती सुलगडले, गुरुनाथ हत्तीकाळे,यल्लालिंग मठाचे स्वामी व परिसरातील नागरिक उपस्थित होते..
