श्री.वटवृक्ष मंदीर संदर्भात महेश इंगळेंची दूरदृष्टी भाविकांच्या सोयीचेच – मा.आ. रविकांत पाटील
मा.आ.रविकांत पाटील यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, अमोलराजे भोसले, संपतराव शिंदे, तम्मा भिमपूरे दिसत आहेत.

श्री.वटवृक्ष मंदीर संदर्भात महेश इंगळेंची दूरदृष्टी भाविकांच्या सोयीचेच – मा.आ. रविकांत पाटील

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि. २३/२/२४) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील सुशोभीकरण व गाभारा नूतनीकरण विलोभनीय असे झाले आहे. या निमित्ताने स्वामी दर्शनाकरिता मोठ्या श्रद्धेने अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांना गाभारा नूतनीकरणानंतर स्वामी समर्थांचे अत्यंत प्रसन्न भावमुद्रेतून दर्शन होत आहे. भाविकांना सुलभतेने स्वामी दर्शन घेता यावे याकरीता महेश इंगळे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्या प्रयत्नातूनच गाभारा नूतनीकरण सत्कार्याची त्यांच्या कार्यकाळात स्वामी समर्थांनी त्यांना एक अनमोल अशी स्वामी सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. महेश इंगळे यांच्या दूर दृष्टीकोनातून हे कामकाज साकारले आहे. भविष्यकाळातही मंदिर समितीचे कामकाज आणखीन विस्तारित होत राहून ही संधी मंदिर समितीचे प्रमुख या नात्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संदर्भात असलेली महेश इंगळे यांच्या दूरदृष्टीस लाभत राहील. या निमीत्ताने श्री.वटवृक्ष मंदीर संदर्भात महेश इंगळेंची दूरदृष्टी भाविकांच्या सोयीचेच
असल्याचे मनोगत माजी आमदार रविकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात झालेल्या विविध कामांचा आढावा घेऊन पाहणी केली. यावेळी माजी आमदार रविकांत पाटील बोलत होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी माजी आमदार रविकांत पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, तम्मा भिमपुरे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, संजय पवार, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – मा.आ.रविकांत पाटील यांचा
देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, अमोलराजे भोसले, संपतराव शिंदे, तम्मा भिमपूरे दिसत आहेत.
