गावगाथाठळक बातम्या
Akkalkot: दुःखद ! वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांच्या पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन

अक्कलकोट- (दि.१०) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांचे आज सायंकाळी ४:३० वाजता वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दिनांक ११/६/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता मानकरी वाडा, धाकटीवेस, मुरलीधर मंदिर शेजारी येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कर्मचारी सेवेकरी यांच्या वतीने कै. सौ. रुपाली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
