गावगाथा
बजरंग बली की,जय घोषाने गौडगाव मारूती मंदीरात हनुमान जन्मोत्सव साजरा…
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी भक्तांनी केले निसार शेख यांचे कौतुक

बजरंग बली की,जय घोषाने गौडगाव मारूती मंदीरात हनुमान जन्मोत्सव साजरा…
हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी भक्तांनी केले निसार शेख यांचे कौतुक
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
रामभक्त हनुमान की जय,पवनसुत हनुमानजी की जय ,जय बजरंगबली की जय,जय घोषाने गौडगांवची पहाट उजडली.जगप्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध मारुती मंदिरात पहाटे तीन वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला.अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात व फटाक्यांच्या अतिषबाजीत सूर्योदयच्या वेळेस जन्मोत्सव संपन्न झाला.हनुमान जन्मोत्सव निमित्त मारुती मंदिरावर निसार शेख यांनी हेलिकॉप्टरने पुष्यवृत्ती केले.
श्री जागृत मारूती मंदीरात हनुमान जन्मोत्सव निमित्त मारूतीस पहाटे तीन वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला.पहाटे पासुन मंदीरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.शनिवारी पहाटे मारूतीस रूद्राभिषेक,
नवग्रह,होमहवन,महाभिषेक व महाआरतीचा विधी पार पडला.यावेळी हजारो भाविक भक्तानी या पुजेचा लाभ घेतले.जन्मोत्सव निमित्त जागृत मारूती मंदीरात भक्तांनी सकाळी ६ वाजता मारूतीचा जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता मानाची पालखी मिरवणूक विविध वाद्य वृंदासह पार पडली. यावेळी श्रीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. घामाच्या धारा अंगावर झेलत भक्तांनी शांततेत दर्शन घेत होते.
सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरने मंदिरावर प्रदक्षिणा घालून गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी राज्यभरातुन आलेल्या लाखो भाविकांनी शांततेत श्रीचे दर्शन घेतले.हजारो भक्तांनी हनुमान चालीसा,मंत्रमंठण करून मंदीर परिसरात भक्तीचा माहोल निर्माण केला.अन्नछत्र मंडळात निसार शेख, नागनाथ दूसा, योगेश कोनापुरे, सचिन सूर्यवंशी, गजानन पवार, दिनेश अग्रवाल, यांच्यावतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचे लाभ घेऊन तृप्त झाले.सकाळ पासून सुरू झालेली भाविकांची गर्दी रात्री पर्यंत कायम होती. यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली
चोक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सोलापूर ब्लड बँक यांच्याकडून रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 60 जणांनी रक्तदान केले.
यावेळी मंदिर समितीचे
सिद्राम वाघमोडे,प्रकाश मेंथे, सिद्धराम फुलारी,चौडप्पा सोलापुरे,बिराप्पा पुजारी,शांतया स्वामी,परमेश्वर सुतार,प्रकाश सनकळ,भारत ननावरे, श्रीशैल कुंभार,आमसिद्ध कोरे,श्रीमंत सवळतोट, श्रीमंत म्हेत्रे,मल्लिनाथ मेत्रे मल्लिनाथ पाटील मल्लिनाथ शेरीकर हाजीमलंग माने विश्वनाथ वाघमोडे शिवानंद सोलापूरे शरणपा बमदे व हनुमान भक्त निसार शेख व त्यांचे परिवार आदींची उपस्थिती होती.

चौकट :
आकरा शनीपौर्णिमा , शनिवार व हनुमान जयंती एकाच दिवशी आल्याने मारूतीचे दर्शन घेतल्याने मनोकामना पुर्ण होते अशी भक्तांची श्रध्दा आहे. आजही या मंदीरात आकरा मंगळवार,शनिवार पाळत असल्याने या जागृत मंदीराला विशेष महत्व प्राप्त झाले.मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस मागणाऱ्या भक्तांनी हनुमान जन्मोत्सव निमित्त आपले नवस फेडले