गावगाथाठळक बातम्या
Solapur: लंकेतून उडी घेतली आणि थेट भारतात दाखल झाली ; सोलापूरच्या कन्येचा समुद्रात पोहण्याचा अद्भुत विक्रम


सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूरची कन्या कु. किर्ती नंदकिशोर भराडीया हिने श्रीलंकेपासून भारतापर्यंत ३२ कि.मी. अंतर समुद्रात १० तास २५ मिनिटे न थांबता पोहून पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे.


दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे १:४५ वाजता तलाईमनार (श्रीलंका) येथून समुद्रात पोहण्यासाठी सुरुवात करून न थांबता पोहली आणि २० सप्टेंबर रोजी दुपारी १२:१० वाजता धनुष्यकोडी (भारत) येथे पोहोचली.

दरम्यान, सोलापूरकरांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे . वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीच्या अधिकाऱ्यांनी “लाँगेस्ट नॉन-स्टॉप ट्रान्सनॅशनल स्विम बाय अ चाइल्ड” हे पुस्तक देऊन तिचा गौरव केला आहे. यामुळे तिचा सर्वत्र कौतुक होत आहे.