विवेकानंद केंद्राच्यावतीने आरोग्य या विषयावरील परिसंवाद संपन्न.
विवेकानंद केंद्राच्यावतीने आरोग्य या विषयावरील परिसंवाद संपन्न.

विवेकानंद केंद्राच्यावतीने आरोग्य या विषयावरील परिसंवाद संपन्न.

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी तर्फे भारतभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्यातील एक उपक्रम म्हणजे जे आज मुलींसाठी खूप गरजेचे व उपयुक्त असे किशोरी विकास उपक्रम.

विविध खेळ, योगासने व्यायाम, ध्यान, गीत, प्रार्थना नाट्यछटा, चर्चा या गोष्टींमधून किशोरींचे विषय हाताळले जातात. हे विषय म्हणजे मूलीचे आरोग्य, सौंदर्य, मैत्री, सुरक्षा, करिअर, संवाद, आध्यात्म, सोशल मिडीया व इतर.

हया सत्रातील ‘आरोग्य’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन दि.२५ जून २०२३, विवेकानंद केंद्र, रेल्वे लाईन्स येथे करण्यात आले. या परिसंवादान अनेक तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले होते. सर्व तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सौ. अनुराधा काजळे यांनी छंद – शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी छंद हे खूप उपयोगी असतात. छंद आपल्याला समृद्ध करतात व सकारात्मक बनवितात, उत्साही व आनंदी ठेवतात. छंद निराशेला, ताण तणावाला लांब ठेवतात व आपल्याला कणखर बनवतात.

नूतन प्रशालेच्या शिक्षिका सौ. प्रियांका आराध्ये यांनी योग, आसन, सूर्यनमस्कार, ॐ कार साधना, मंत्र उच्चार प्राणायाम् सर्वांचेच शरीरावर व मनावर होणारे सकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन.
बालरोग तज्ञ डॉ. सीमा साखरे यांनी पालकांनी मुलींना वयात येण्याच्या आधीपासूनच चांगल्या सवयी, सकस आहार, चांगले विचार दिले तर ते त्याचे पुढील आयुष्य घडविण्यात खूप उपयोगी पडते. मुलींनी कणखरपणे व आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला न घाबरता सामोरे जावे.
त्वचा रोग तज्ञ डॉ.स्मिता चाकोते यांनी-सौंदर्याची पाच सुत्रे सौंदर्य हे फक्त शरीराचे नसून मनाचे पत्र आहे. आपण जे खातो, पितो, पहातो, एकतो, करतो या सर्वांचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होत असतो. सौंदर्य वाढण्यासाठी योग्य आहारा बरोबर, व्यायाम, ध्यानधारणा, चांगले विचारपण महत्वाचे आहेत.
स्त्रीरोग तज्ञ डॉ शिवकांची चिप्पा यांनी
किशोरी अवस्थे मध्ये अनेक बदल होत असतात. त्या बदलांना सामोरे जाताना शरीराची काय विशेष काळजी घ्यावी हे त्यांनी सांगितले.
मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ पद्मजा गांधी यांनी किशोरावस्थेत मन कधी खूप आनंदी, कधी उदास, कधी खूप हळवे, कधी खूप राग. हया सर्वांना स्वीकारून स्वतःला योग्य प्रकारे ओळखा व घडवा. हया वयात मित्र-मैत्रिणी खूप जवळचे वाटतात पण सर्वांत प्रथम हे आपले कुटुंब आहे हे लक्षात ठेवून नेहमी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे.
क्रीडा शिक्षिका प्रा.सुवर्णा कांबळे यांनी आरोग्य व खेळाचे महत्त्व खेळ हे फक्त शरीर नव्हे तर मनही कणखर बनवत. प्रतिकार शक्ति वाढते. आव्हान पेलण्याची क्षमता वाढते.
प्रा.डॉ. सुजाता मुदगुंडी यांनी योग्य जीवनशैली कशी असावी? मुलींनी वेळेचे नियोजन, शिस्तं, दिनचर्यो व्यायाम, अभ्यासाचे नियोजन यावर मार्गदर्शन केले.
आहार तज्ज्ञ डॉ.सपना दोडमनी यांनी
समतोल आहार कसा असावा. समतोल आहार हा योग्य वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. शक्यतो घरचेच अन्न खावे. डब्बा बंद खाद्य व जंक फुड कितीही आकर्षक असले तर शरीराला हानिकारकच.
वरील सर्व मान्यवरांनी अतिशय उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमात काडादी हायस्कूल, वालचंद कॉलेज, कन्या प्रशाला, सरस्वती प्रशाला व पूल्ली विद्यालय तसेच श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच येथील विद्यार्थी व शिक्षिका उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाताई गोरे, उपक्रमाची माहिती सविताताई म्याकल, प्रास्ताविक व मान्यवरांचे परिचय संगिताताई सपार यांनी केले. डॉ शोभानाताई शहा यांनी समारोप केला.