आमची मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत वागदरीचा युवा धावपटू सोहेल नदाफ पटकाविला प्रथम क्रमांक
आमची मुंबई स्पर्धा २०२३

आमची मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत वागदरीचा युवा धावपटू सोहेल नदाफ पटकाविला प्रथम क्रमांक


वागदरी – अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील युवा धावपटू सोहेल नदाफ यांनी पुन्हा एकदा आपल्या चपळाई घ्या जोरावर मुंबई येथे झालेल्या आमची मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत ५ कि.मी विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.१६ मिनिटं ३८ सेंकद वेळात स्पर्धा पूर्ण केला व घवघवीत यश मिळवत पहिला क्रमांक पटकाविला आहे.
मान्यवरांच्या हस्ते स्मृति चिन्ह पदक देऊन गौरविण्यात आले. सोहेल नदाफ याने गेल्या काही वर्षांपासून विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळविले आहे.लहान वयात जिद्द व मेहनत च्या जोरावर सोहेल या क्षेत्रात चिकाटीने सातत्याने यश संपादन करत आहे.घरची परिस्थिती नाजूक असूनही कष्टाने सोहेल नदाफ स्पर्धा गाजवतो आहे.त्याला योग्य मार्गदर्शन व आर्थिक मदतीची गरज आहे.


