सामाजिक बांधिलकी

अक्कलकोट तालुक्यातील अपघातात मृतांच्या नातेवाईकांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विशेष प्रयत्न करुन मृत नातेवाईक प्रत्येकी रु.1 लाख मदत

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाला यश

अक्कलकोट तालुक्यातील अपघातात मृतांच्या नातेवाईकांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विशेष प्रयत्न करुन मृत नातेवाईक प्रत्येकी रु.1 लाख मदत

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : आजपर्यंत राज्यात खाजगी वाहन अपघातात मृत पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जात नव्हते. मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विशेष प्रयत्न करुन मृत नातेवाईक प्रत्येकी रु.1 लाख मदत मिळवून दिले.
सदरील अपघात दौंड तालुक्यातील चौफुला येथील राष्ट्रीय महामार्गावर दि.1 फेब्रुवारी 2023 रोजी अक्कलकोट तालुक्यातील आरती अंबण्णा बिराजदार (चपळगाव), गणपती मलप्पा पाटील (सलगर), अमर महांतेश कलशेट्टी (गोगाव) या मृतांच्या वारसांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शनिवार, 29 जुलै 2023 रोजी मृत नातेवाईकांच्या घरी जावून प्रत्येकी रु.1 लाखाचा धनादेश दिले. यावेळी तहसिलदार बाळासाहेब शिरसट, मंडल अधिकारी आर.एस. भासगी, डी.आर.पांढरे, राजकुमार कोळी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    


यावेळी मृतांचे वारसदार अंबण्णा बिराजदार, संजयकुमार गणपती पाटील, महांदेव बसवणप्पा कलशेट्टी, सलगर येथे डॉ.शिवानंद सुगुरे, बसवराज बिराजदार, मल्लिनाथ जमशेट्टी, रत्नाकर पाटील, सिध्दाराम जेऊरगी, मल्लिनाथ जनवडे, राजकुमार झिंगाडे, प्रदिप जगताप, कल्याणराव बिराजदार, कमलाकर सोनकांबळे, मल्लिनाथ बिराजदार, दत्ता पुजारी, राजकुमार हुग्गे, राजकुमार कोळी, सचिन घुगरे, शरणप्पा कलशेट्टी, गोगाव येथे महादेव सोनकवडे, शिवा घोळसगाव, सुनिल सावंत, संतोष पोमाजी, शरणप्पा मंगाणे, घाळय्या मठपती, शाम बाबर, प्रकाश पोमाजी, चपळगाव येथे सरपंच उमेश पाटील, अक्कलकोट बाजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील, अंबणप्पा भंगे, बसवराज बाणेगाव, मनोज इंगुले, सुरेश सुरवसे, राजु भंगे, हनुमंत सानप , योगेश जारवाले, आदीजण उपस्थित होते.
दरम्यान 1 फेब्रुवारीच्या घटनेनंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देवू अशी ग्वाही दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रु.1 लाखांचा धनादेश मृतांना वारसांना प्रत्येक गावात जावून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी धनादेश दिले. आमदार कल्याणशेट्टी यांच्या या कार्याबद्दल विधानसभा मतदारसंघात समाधान व्यक्त होत आहे.
आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडून विधानसभा मतदारसंघाच्या विकासा बरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या चार वर्षात त्यांच्याकडून उल्लेखनीय कार्य घडत असल्याने जनतेच्या मनातील लोकाभिमुख आमदार म्हणून पाहिले जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button