
नव्या शोधात या काव्यसंग्रहाला राजयुवा विशेष काव्यसंग्रह पुरस्कार 2024

पुणे,
राजयुवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य व राजयुवा प्रकाशन पुणे. यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी एकादशी निमित्त आयोजित शब्द पंढरीचे आम्ही वारकरी कवी संमेलन 2024 याचे आयोजन दिनांक 17 जुलै 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.

या कवी संमेलनामध्ये विविध पुस्तकांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यामध्ये शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील युवा कवी लेखक राहुल दादा शिंदे यांनी वयाच्या आठव्या वर्षी प्रकाशित केलेल्या नव्या शोधात या काव्यसंग्रहाला यावर्षीचा राजयुवा विशेष काव्यसंग्रह पुरस्कार 2024 मिळाला.

या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय शैलेंद्र भणगे हे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वेदपाठक आणि विशेष उपस्थिती म्हणून सौ ललिता श्रीपादजी सबमीस या उपस्थित होत्या यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

वय लहान पण कर्तृत्व महान
या ओळींना शोभून दिसणारा असा व्यक्ती महत्त्व ग्रामीण भागातील कवी राहुल दादा शिंदे यांनी अगदी उत्कृष्ट असा लिहिलेला काव्यसंग्रह नव्या शोधात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि रसिकांच्या मनात घर करून एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
