
शिक्षकांचे कैवारी तात्यासाहेब सुळे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी संध्या. शिक्षक लोकशाही आघाडी (टी डी एफ) मुंबई चे वतीने तात्यांचा स्मृतीदिन शेकाप मध्यवर्ती कार्यालय फोर्ट मुंबई येथे टीडीएफ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला, सर्वांनी भाषणबाजी न करता टीडीएफ चे कार्य आणखी पुढे व तळागाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पर्यंत कसे नेता येईल व त्यासाठी काय योगदान करणार यावर मत व्यक्त केले, सर्वांनीच तन मन धनाने तात्यांनी दिलेला टीडीएफचा पुरोगामी विचार व कार्य पुढे नेण्याचा संकल्प केला.टीडीएफ मुंबई चे पुनर्रचनेवर चर्चा झाली, सालाबाद प्रमाणे येणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलन हे तज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक आराखडा, गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण या विषयांवर शिक्षक शिक्षकेतर कार्यकर्ता चर्चासत्र आयोजित करण्यात यावे असे ठरले.टीडीएफ चे अन्याय अत्याचार सहन न झाल्याने नोकरी गमावलेले कार्यकर्ते आता वकील बनले असून TDF उपाध्यक्षा सन्मा ॲड अपूर्वा दाभोलकर यांनी दोन वर्षापासून बार कौन्सिल चे सदस्य बनून मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली आहे,TDF प्रवक्ते, पत्रकार ॲड सन्मा सुरेंद्र कुमार मिश्रा यांनी नुकत्याच बार कौन्सिल च्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन सनद मिळविली आहे त्या दोघांचा सत्कार कऱण्यात आला,तर सन्मा ॲड अर्चना सोनावणे ह्या ३१ डिसेंबर २०२४ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या असून लवकरच त्या बार कौन्सिल च्या परीक्षा देऊन सनद घेणार आहेत, अजून तीन ते चार कार्यकर्ते लॉ करीत आहेत ही टीडीएफ साठी अभिमानाची बाब आहे. राज्यांतील कुणाही अन्यायग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर्थिक अडवणूक होणार नाही म्हणून TDF वकिलांची टीम माफक दरात सेवा देणार आहेत.
टीडीएफ चे कार्यकर्ते जमेल तसे सामाजिक कार्य करीत असतात पण सन्मा श्री गणेश हिरवे हे त्यांच्या जॉय सामाजिक संस्थेतर्फे सातत्याने वर्षभर राज्यांतील आदिवासी, मागास भागातील विद्यार्थी, गरजू जनतेला शैक्षणिक साहित्य, शिधा, धान्य व गृहउपयोगी वस्तूंचे वाटप समाजातून, सहकाऱ्यांकडून वर्गणी जमा करून, पदरमोड करून करत असतात त्यांना नुकताच आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला. उपस्थित सर्वांचे आभार मानून सुग्रास भोजनानंतर स्मृतिदिन सोहळा संपन्न झाला.
