गावगाथा

महिलांना आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक… डॉ. अनिता मुदकन्ना 

रोटरीच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव.....

महिलांना आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक… डॉ. अनिता मुदकन्ना 

रोटरीच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव…..

मुरूम, ता. उमरगा, ता. ११ (प्रतिनिधी) : महिलांनी स्वतःच्या व इतर महिलांच्या यशाचा गौरव केला पाहिजे. अनेकदा समाजात महिलांना कमी लेखले जाते, त्यामुळेच महिलांनी एकमेकींचे समर्थन करणे आवश्यक आहे. आर्थिक, मानसिक, सामाजिक स्वावलंबन महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वतःच्या स्वातंत्र्याविषयी आणि आत्मनिर्भरतेविषयी बोलले पाहिजे. लैंगिक भेदभाव, सुरक्षितता, समान संधी यासारख्या विषयांवर चर्चा करून उपाय शोधणे गरजेचे आहे. स्वतःला कमी लेखू नका, स्वतःचा आदर करा, तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. तरुण मुलींना योग्य दिशा दाखवणे, त्यांना शिक्षण, करिअर व आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. अनिता मुदकन्ना यांनी केले.
रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे होते. यावेळी प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, राजयोगी वैजीनाथ (येरमाळा), ब्रह्मकुमारी अनुसया, केंद्राचे संचालक राजूभाई भालकाटे, रोटरीचे सचिव सुनिल राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योजिका मीराबाई शिंदे, श्रुती चौधरी, सावित्रीबाई कोकणे, पोलीस हवालदार मनीषा लोखंडे, पूजा मुळे, रामेश्वरी पवार, आफरीन मुजावर, डॉ. प्रिती चिलोबा, डॉ. चैतन्या काबरा, डॉ. शिल्पा डागा, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. वर्षा बिराजदार, ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका पूजा जाधव, शितल सुरवसे, राजश्री जाधव, सुजाता स्वामी, लालूबाई राठोड, ममता साबणे, ब्रह्मकुमारी अनुसया, वैष्णवी, सुंदर भालकाटे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवकन्या भालकाटे यांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर मनोगत व्यक्त केले. मनोगत डॉ. चैतन्या काबरा, प्रिती चिलोबा, मनीषा लोखंडे यांनी मनोगत तर श्रुती चौधरी यांनी कविता सादर केली. यावेळी आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. महेश मोटे, उपप्राचार्य कलया स्वामी, प्रा. भूषण पाताळे, प्रकाश रोडगे, मल्लिकार्जुन बदोले, शिवशंकर स्वामी, डॉ. महेश स्वामी, राजकुमार वाकडे, कलाप्पा पाटील या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन डागा यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार सुनिल राठोड यांनी मानले. यावेळी परिसरातील बहुसंख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रात जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटन करताना अनिता मुदकन्ना, कमलाकर मोटे व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button