गावगाथा

माधवराव पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी…..

दिनविशेष

माधवराव पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी…..
(मुरूम प्रतिनिधी)
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मंगळवारी ( ता.६ ) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार संघ, धाराशिव व मुरूम शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. रामलिंग पुराणे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व प्रतिपादन करताना पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधन करून देशहित, राष्ट्रप्रेम जपले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांची लेखणी करते. असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष डॉ. सुधीर पंचगल्ले, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सादक वली, रोटरीचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, राजेंद्र कारभारी, जमीर शिकलकर, राजेंद्र घोडके, महेश निंबरगे, अमोल गायकवाड, अजिंक्य मुरूमकर, जगदीश सुरवसे, बालाजी व्हनाजे, नाहीरपाशा मासूलदार, हुसेन नुरसे, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. शिला स्वामी, प्रा. वैष्णवी पाटील, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. प्रतापसिंग राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती. योगेश पांचाळ, किशोर कारभारी, दत्तू गडवे आदींनी पुढाकार घेतला. प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजित मटकरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. अजिंक्य राठोड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना चंद्रकांत बिराजदार, सुधीर पंचगल्ले, रामलिंग पुराणे, राजेंद्र कारभारी, महेश निंबरगे सह पत्रकार बांधव, कर्मचारी वृंदासह उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button