खुतबोद्दीन चिनुमिया शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
*आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त सोलापूरात 'वसंत महोत्सव' पार पडला.*


*आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त सोलापूरात ‘वसंत महोत्सव’ पार पडला.*

सोलापूर प्रतिनिधी – रविवार दि.७ जुलै २०२४ रोजी सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात वसंत महोत्सव पार पडला. १जुलै आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या १११ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यात १ ते ३१ जुलै पर्यंत ठिकठिकाणी वसंत महोत्सव घेतला जात आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहरात देखील वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून गोर बंजारा धर्मपीठ पोहरागड येथून धर्मगुरू जितेंद्र महाराज, प्रसिद्ध उद्योगपती किसनभाऊ राठोड उपस्थित होते. यावेळी हरित क्रांतीचे प्रेणेते वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेत दहावी / बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव , आदर्श शेतकरी सन्मान, आदर्श शिक्षक पुरस्कार असे विविध उपक्रम घेण्यात आले. एकूण वीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर आदर्श शेतकरी म्हणून नायक लालू राठोड, बाळासाहेब रजपुत, विकास राठोड, महादेव रोकडे, नेहरू राठोड, किसन राठोड यांना सन्मानित करण्यात आले. ज्ञान दानाचे पवित्र कार्य करणारे आदर्श शिक्षक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय केगाव . शाळेचे शिक्षक श्री खुतबोद्दीन शेख सर श्री. कैलास राठोड सर, तेरामैल आश्रम शाळेचे श्री सुभाष पवार सर, मोहोळ येथील जि.प.शाळेचे श्री पिंटू राठोड सर,विवेकानंद इन्स्टिटयूटचे श्री आकाश राठोड सर यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.राष्ट्रीय बंजारा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेला अतिशय सुंदर कार्यक्रम युवा प्रदेशाध्यक्ष श्रीमंतराजे चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडला.
या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून गोरबोली चळवळीचे संयोजक गोर प्रकाश राठोड, शिवाजी राठोड (हामुगड अथणी), महंत गोपाल महाराज विजयपूर, बंजारा नेते विजय राठोड मुळेगाव तांडा, भाजपा नेते राजाभाऊ आलूरे (बाळे),तांडा सुधार योजनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, शिवाजीनगर तांड्याची नायकण मथुराबाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राठोड, नामराजे पवार, करण रजपुत, मोतीराम पवार,सचिन रजपुत आदिंसह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
या महोत्सवानिमित्त बोलताना अनेक मान्यवरांनी नाईक साहेबांच्या कार्याला उजाळा देण्याचा काम केला. त्यांच्या कार्याचा गौरव करून वसंतराव नाईक साहेब हेच बंजारांचे आदर्श आहेत. समाजाने नाईक साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी असे प्रतिपादन किसनभाऊ राठोड यांनी केले.या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रवक्ते गोर मिथुन राठोड यांनी केले.
