विद्यार्थी आणि युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : डॉ.बाबासाहेब आंबेडकर — प्रा.चंद्रकात पोतदार
भुरीकवठे ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन....

विद्यार्थी आणि युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : डॉ.बाबासाहेब आंबेडकर — प्रा.चंद्रकात पोतदार

भुरीकवठे ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन….
भुरिकवठे तालुका अक्कलकोट येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना म्हणाले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख केवळ भारतात नव्हे तर जगाच्या पाठीवर आहे. भारतासारख्या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या देशाला जगातील सर्वात मोठी आणि आदर्श राज्यघटना ज्या महामानवाने दिली त्या महामानवाच्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासून अनेक संकटे आ वासून उभी होती मात्र त्या प्रत्येक संकटांना तोंड देत, त्यावर मात करत बाबासाहेब आंबेडकर वाट चालत राहिले. आपल्या सबंध आयुष्यात त्यांनी देशासाठी प्रचंड मोठे योगदान दिले. आणि म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी आणि सर्वच समाज घटकांसाठी प्रेरणादायी आहे.

