पत्रकारांच्या लेखनीमुळे तालुक्यात विकासकामे करण्यासाठी मिळाले बळ— आमदार सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा यथोचित सन्मान करताना मान्यवर.

पत्रकारांच्या लेखनीमुळे तालुक्यात विकासकामे करण्यासाठी मिळाले बळ—
आमदार सचिन कल्याणशेट्टी
——

अक्कलकोट दि.07( प्रतिनिधि)

गेल्या दोन अडीच वर्षांत पत्रकार बांधवांनी तालुक्यातील विकास कामांना प्राधान्य देत वेळोवेळी विकासकामांच्या बातमीला प्रसिद्धी देत गेल्याने तालुक्यातील विकासकामे मार्गी लागण्यास मदत झाली.तसेच तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी एक प्रकारचे बळ मिळाल्याचे मत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

दि 6 जानेवारी हा दिवस दर्पणकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन हाच पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट येथील भाजप कार्यालयात तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,शहराध्यक्ष शिवशरण जोजन,भाजपचे जेष्ठनेते मल्लिनाथ स्वामी,माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे,चंद्रकांत दसले व तालुक्यातील सर्व दैनिकाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की,सन 2022 ते 2024 हा काळ माझ्यासाठी अतिशय महत्वाचे होता.याकाळात बर्याच पत्रकारांनी आपल्या प्रकरलेखणीच्या माध्यामातून तालुक्यातील विकासकामांच्या बातम्यांना प्रसिद्धी देत गेल्याने तालुक्यातील विकासकामे करण्यास प्रेरणा मिळत गेली. याच प्रकारे आता पुढील दोन वर्षे ही अतिशय महत्त्वाचे आहेत या पुढील दोन वर्षांत सर्व पत्रकार आणि इतर राजकीय नेत्यांनी विकास कामांना प्राधान्य दिल्यास अक्कलकोट तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर सन्मानाला उत्तर देताना म्हणाले की,तालुक्यात नेहमीच पत्रकारांच्या मानसन्मानासाठी पुढे येणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी आता पत्रकारांच्या भवनासाठी पुढाकार घ्यावा आणि अक्कलकोट समर्थांच्या पुण्यनगरीत पत्रकारांसाठी एक भव्य पत्रकार भवन बांधून देण्याची मागणी करताच सर्वच पत्रकारांनी टाळ्यांच्या गजरात पत्रकार भवनाची मागणी उचलून धरली.यावेळी पत्रकार मारुती बावडे,आरपीआय चे नेते अविनाश मडिखांबे,आनंद तानवडे आदींनी मनोगत व्यक्त करीत पत्रकारांना बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी तालुक्यातील सर्व दैनिकचे पत्रकारांचा यावेळी यथोचित सन्मान करुन गौरव करण्यात आले.यावेळी प्रशांत भगरे,शिवानंद फुलारी,योगेश कबाडे,अरविंद पाटील,रविकांत धनशेट्टी,चेतन जाधव,सोमशेखर जमशेट्टी,नंदू जगदाळे, महेश गायकवाड,स्वामीराव गायकवाड,दयानंद दणुरे रमेश भंडारी,सैदप्पा इंगळे,यशवंत पाटील,शिवा याळवार,शिवानंद गोगाव,रियाज सैय्यद,आदित्य अंबुरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
फोटो ओळ
अक्कलकोट येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा यथोचित सन्मान करताना मान्यवर.