गावगाथा

आंध्र प्रदेश सेट परीक्षेत ५३ प्रश्नः धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तका मधून!

शैक्षणिक बातमी

आंध्र प्रदेश सेट परीक्षेत ५३ प्रश्नः धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तका मधून!

अक्कलकोट: विद्यापीठ अनुदान आयोग यु जी सी नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली आंध्र विद्यापीठ ,विशाखापट्टणम यांनी आंध्र प्रदेशा राज्यतील प्राध्यापक होण्यासाठी असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा एपी सेट परीक्षा दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी आंध्र प्रदेशातील ८ विभागीय क्षेत्रात म्हणजे विशाखापट्टणम, राजमुंडरी ,गुंटूर ,नेलोर ,अनंतपुर ,तिरुपती, कडपा आणि करनूल येथे एकूण ३० विषयांत सेट परीक्षा घेण्यात आला.या परीक्षेसाठी३८,०७८ विद्यार्थी बसले होते.


अक्कलकोट येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक धानय्या कौटगी मठ सर यांच्या पुस्तक मधील पेपर १ अध्यापन व संशोधन क्षमता मध्ये २० प्रश्नः आणि पेपर २ इंग्रजी साहित्य मध्ये ३३ प्रश्नः असे एकूण ५३ प्रश्नः आले आहेत. धानय्या सर स्वतः ही परीक्षा दिले आहेत ही त्यांचं ७१ वी परीक्षा आहे. देशातील विविध राज्यातील सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम नोंदविला आले . या परीक्षेतील मिळालेल्या अनुभव आधारे यु ट्यूब द्वारे मराठी, कन्नड, इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांना मोफ़त मार्गदर्शन करीत आहेत. आता पर्यंत ४७० विद्यार्थी सेट नेट उत्तीर्ण झालेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button