तुकाराम गोडसे म्हणजे युवा पत्रकारितचा नवा अध्याय – स्वप्नील कुंजीर पाटील
तुकाराम गोडसे यांनी आपले स्वतःचे रॉयल मीडिया नावाचे साप्ताहिक सूरू केले आहे

तुकाराम गोडसे म्हणजे युवा पत्रकारितचा नवा अध्याय – स्वप्नील कुंजीर पाटील

पत्रकार क्षेत्रात आपल्या पंचक्रोशीत आजही तेवढंच आदरानं घेतलं जाणार नाव.. लहानापासून ते मोठ्यापर्यंत आपुलकीने बोलणार व्यक्तिमत्व…एक तरूण संपादकाची तेजोमय कारकीर्द ख-या अर्थाने सुरू झाली, ते नाव म्हणजे पत्रकार तुकाराम गोडसे

अनेक वर्ष तुकाराम गोडसे नावाचे पत्रकारितेतील वादळ समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी रात्री अपरात्री सर्वदूर घोंघवताना पाहिले आणि या तरुण पत्रकाराची समाजासाठी असणारी तळमळ दिसून आली, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार.. तो भक्कम पाया मजबूत असेल तरच लोकशाही तग धरून राहायला मदत होते,पत्रकार होणे म्हणजे सोपे काम नाही नेहमी जागरूकता अंगी बाळगून काम करण्याची उमेद म्हणजे खरी पत्रकारिता आणि याच गुणाने समाजास ख-या खोट्याची जान करुन देण्याचे काम तुकाराम गोडसे करत असल्याने त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच… वयाच्या विशीत पत्रकारिता कारकिर्दीस सुरुवात करणारे आणि आपली वेगळी छाप निर्माण करणारे निर्भिड पत्रकार म्हणून तुकाराम गोडसे यांच्याकडे पाहिले जाते, मी अनुभवलेले निस्वार्थी पत्रकार… ४ जुलै २०१७ ची पहाट मला आठवते..पहाटेचा ४ चा सुमार…पुणे सोलापूर महामार्गावर टोल नाका जवळ भीषण अपघात झालेला…पहाटे ४ ची वेळ असूनही फोन वाजला आणि पलीकडून आवाज आला पत्रकार तुकाराम गोडसे बोलतोय, मोठा अपघात झालेला आहे मदत कार्यासाठी आलोय, आपण ही तत्काळ पोहचा पोलीस स्टेशनला ही गोडसे यांनी फोन करुन बातमी दिली आणि अपघातग्रस्त लोकांना मदत कार्य ताबडतोब मिळवून देणारे पत्रकार म्हणून मला त्यांचे खूप अप्रुक वाटले..त्यावेळी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग आमच्या अजूनही मनात आहे, एका पोलिसांकडून टोलनाक्यावर झालेल्या मारहाणीचा निषेध फक्त पुण्यात झाला नव्हता तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरला होता, महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकार तुकाराम गोडसे यांच्या न्यायासाठी निवेदने देत होता, संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.. पण अखेर न्याय मिळालाच.. तुकाराम गोडसे यांची पुणे सोलापूर रोडचा निर्भीड पत्रकार म्हणून कायम ओळख राहिली.. काहीही घडू द्या, निम्या रात्री हा माणूस नागरिकांच्या सेवेसाठी उभा राहायचा…आजकाल फायदा तोटा पाहून लोकं वेळ देतात पण फक्त कर्तव्य म्हणून अडचणीतील लोकांसाठी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरणारे पत्रकार गोडसे यांच्याकडे पाहून खरी पत्रकारिता जिवंत असल्याचा अनुभव येतो. गोडसे यांचा पत्रकार ते संपादक असा संघर्षमयी प्रवास कौतुकास्पद आहे,आज त्यांनी स्वतः च्या कष्टाने जिद्दीने आणि हिंमती ने महाराष्ट्रातील इतर पत्रकारांसाठी रॉयल मिडिया डिझाइन्स प्रा लि नावाची कंपनी उभा केली त्या कंपनीचा डोलारा एवढा वाढला कि महाराष्ट्र राज्यात नव्हेच तर इतर राज्यात या रॉयल मीडिया कंपनीचा व्यास वाढला आहे..त्यालाच जोड म्ह्णून तुकाराम गोडसे यांनी आपले स्वतःचे रॉयल मीडिया नावाचे साप्ताहिक सूरू केले आहे याला भर भरून शुभेच्छा देतो आणि त्यांची कारकीर्द दैदिप्यामान होवो हिच आई तुळजा भवानी कडे प्रार्थना करतो

स्वप्नील वसंतराव कुंजीर पाटील
शिवसेना संघटक, पुणे
