वागदरीच्या सौ. शैलशिल्पा जाधव यांचा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ निमित्त सकल मराठा समाजातर्फे सत्कार
वागदरी (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, बाळे यांच्या वतीने श्री परमेश्वर विद्यावर्धक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री एस. एस. शेळके प्रशाला, वागदरी येथील कर्तव्यदक्ष पर्यवेक्षिका सौ. शैलशिल्पा जाधव यांना यंदाचा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री एस. एस. शेळके प्रशालेचे चेअरमन श्री. बसवराज शेळके, संचालक भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शिवाजी सावंत, तसेच सुनील सावंत, श्याम बाबर, मारुती शिंदे आणि प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सौ. शैलशिल्पा जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री एस. एस. शेळके प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उपस्थित राहून सौ. शैलशिल्पा जाधव यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. संपूर्ण वागदरी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या सन्मानामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!