गावगाथा

श्री राजकुमार काशिनाथ कुलकर्णी यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ म्हणून सन्मानित

सत्कार समारंभ

श्री राजकुमार काशिनाथ कुलकर्णी यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ म्हणून सन्मानित
भुरिकावठे येथील शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार कुलकर्णी यांना नुकतेच सोलापूर जिल्हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेतर्फे ‘आदर्श आणि प्रभावी मुख्याध्यापक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. कुलकर्णी सर गेल्या पाच वर्षांपासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांनी अक्कलकोट तालुक्यात एक कडक आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. माजी आमदार सावंत म्हणाले की, हा सन्मान कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली शाळेच्या सातत्याने सुधारणाऱ्या शैक्षणिक निकालांची साक्ष आहे. यावेळी त्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार आष्टे, उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, सचिव अप्पासाहेब गवसने व संचालक मंडळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .याप्रसंगी शाळेचे कर्मचारी शिवानंद ढंगापुरे, मोनेश्वर सुतार,अजित गवसने, सुहास सोलनकर, प्रशांत गायकवाड, हनुमंत धूळशेट्टी, दिलीप व्हदलूरे , सौरभ आष्टे आदींनी अभिनंदन केले. शिवानंद कांबळे, युवराज कुंभार, सुनील वडरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button