अक्कलकोट आगारासाठी अभिमानाचा क्षण..! मा. आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसांचे लोकार्पण
अक्कलकोट | प्रतिनिधी
अक्कलकोट आगारासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरलेल्या कार्यक्रमात मा. आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अक्कलकोट आगारात ‘राजमाता जिजाऊ’ या पाच नव्या बसांचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले.

या नव्या बससेवेच्या समावेशामुळे अक्कलकोट तालुक्यातील तसेच परिसरातील हजारो प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. एस.टी. महामंडळाच्या सेवेला अधिक बळकटी मिळणार असून ग्रामीण भागातील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातही मोठी सोय होणार आहे.
लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नव्या बसांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास आणखी दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
अक्कलकोट आगारात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसांचा समावेश झाल्याने चालक, वाहक, कर्मचारी तसेच प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बसांमुळे वेळेवर, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी विविध मान्यवर, एस.टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मा. आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या या प्रयत्नांमुळे अक्कलकोटच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!