अक्कलकोट विरक्त मठात पुज्य श्री बसवलिंग महास्वामीजी शुभ हस्ते महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ मार्गदर्शक पुस्तकाची प्रकाशन
महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ मार्गदर्शक पुस्तक प्रकाशन

अक्कलकोट विरक्त मठात पुज्य श्री बसवलिंग महास्वामीजी शुभ हस्ते महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ मार्गदर्शक पुस्तकाची प्रकाशन
महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ मार्गदर्शक पुस्तक प्रकाशन
अक्कलकोट : येथील विरक्त मठात पुज्य श्री बसवलिंग महास्वामीजी शुभ हस्ते महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ मार्गदर्शक पुस्तकाची प्रकाशन आज करण्यात आला.

के एल ई मंगरुळे प्रशाला अकक्कलकोट येथील शिक्षक दानय्या कौटगीमठ लिखित महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर 1 अध्यापन आणि संशोधन अभियोग्य ता पुस्तक मराठी माध्यमचे पुस्तक प्रकाशन करण्यात आला. देशातील वेगवेगळ्या राज्यातील ७९ वेळी सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम करून ,स्वतःला मिळालेल्या ज्ञान ,अनुभव आणि कौशल्य याच्या आधारावर मराठी माध्यमातून पुस्तक लिहले आहेत.

यु जी सी अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी ४०वी महाराष्ट्र गोवा सेट परीक्षा येत्या १५ जून २०२५ रोजी होणार आहेत. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपण या मराठी माध्यमातून उपलब्ध असलेल्या पुस्तक व्यवस्थित रित्या वाचन करून यशवंत व्हावी. डी जी के सेट नेट या यु ट्यूब चॅनेल मार्फत दानय्या कौटगी मठ सरानी दर रोज एक तास मराठी ,कन्नड आणि इंग्रजी भाषेत सेट नेट परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी साठी मोफत मार्गदर्शन करीत आहेत.४० हजार विद्यार्थी याची लाभ घेत आहेत.आता पर्यंत ९५८ विद्यार्थी सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत
