

डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांचा सत्कार

सोलापूर : जिल्ह्यातील कुरनूर येथे सुरु असलेल्या राजमाता जिजाऊ जयंती सोहळ्यात डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यानिमित्ताने राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, कुरनूर यांच्यावतीने डॉ. चेंडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वजीत बिराजदार, सुप्रसिद्ध व्याख्याते मा. वसंत हंकारे, सीमा सुरक्षा बल निवृत्त सैनिक अण्णासाहेब मोरे, मा. बाळासाहेब मोरे, केदार मोरे, समाधान मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

……………………………..
