वटवृक्ष मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांच्या संख्येत वृध्दी – एटीएस चिफ कुलकर्णी
अतुलचंद्र कुलकर्णी यांचा सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे व अन्य दिसत आहेत.

वटवृक्ष मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांच्या संख्येत वृध्दी – एटीएस चिफ कुलकर्णी

(प्रतिनिधी अक्कलकोट,) – येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे देश विदेशासह राज्यभरात अनेक स्वामी भक्त आहेत. वटवृक्ष मंदिरातील भौतिक सौंदर्य येणाऱ्या भाविकांचे मन मोहून घेत आहे. आम्हाला स्वामींचे दर्शन घेण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमच्या मंदिरातील आगमनाची दखल घेऊन तात्काळ स्वामी दर्शनाची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिली. महेश इंगळे साहेबांच्या कृपेमुळे लवकरात लवकर स्वामी दर्शनाचा दुर्मिळ योग लाभला. त्यामुळे मन प्रसन्न झालेले आहे. केवळ आमच्यासाठीच नाही तर येथे येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांसह अबालवृद्धांसाठी महेश इंगळे हे नियमीतपणे स्वतः वटवृक्षाखाली उभे राहून सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुरळीत व सुलभतेने कसे होईल याकडे जातीने लक्ष देतात. स्वामी दर्शनाकामी कुठल्याही भाविकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याचा प्रसंग आल्यास त्यांना तातत्काळ मदतीचा हात देतात. हे आज आमच्या निदर्शनास आले आहे. या निमित्तानेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे स्वामी भक्तांची संख्या वाढत असल्याचे मनोगत दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अतुलचंद्र कुलकर्णी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन देवस्थान कार्यालयात सपत्नीक सत्कार केला. याप्रसंगी अतुलचंद्र कुलकर्णी बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – अतुलचंद्र कुलकर्णी यांचा सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे व अन्य दिसत आहेत.
