गावगाथा

परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रेरणेतून पुरातन संस्कार शिबीर’ असून, या शिबिरास श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवपुरी (यज्ञ नगर) येथे दि.१ जून २०२४ पासून सुरु झाले

परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रेरणेतून पुरातन संस्कार शिबीर’ असून, या शिबिरास श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)

*परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रेरणेतून ‘श्री गुरुदेव सेवा संस्था’ संचलित ‘समाधान’ आश्रमातून अनेक लोकोपकारी उपक्रम राबविले जातात, त्यापैकीच एक अभिनव उपक्रम म्हणजे ‘पुरातन संस्कार शिबीर’ असून, या शिबिरास श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.*

शिवपुरी (यज्ञ नगर) येथे दि.१ जून २०२४ पासून सुरु झाले होते. या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे; पुरातन काळापासून अनेक ऋषी मुनींच्या दिव्य योगदानातून विकसित झालेली, ‘भारतीय परंपरेनुसार जगण्याची कला’ शिबीरार्थींना अवगत करून दिली जाते. वीरशैव लिंगायत संप्रदायातील साधना पद्धती, मूल तत्व-सिद्धांत, योगासने, सात्विक आहार बनवण्याची पद्धत, स्वावलंबी जीवन कसे जगावे इत्यादीचे ज्ञान प्रत्यक्षात कृतीतून अवगत केले जाते.

सदरचे शिबीर ‘समाधान मेळा’ अक्कलकोट यांच्या वतीने निःशुल्क स्वरूपात राबविण्यात आले. या शिबीरासाठी ५० शिबीरार्थी निवडले गेले. याप्रसंगी श्री घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी बोलताना म्हणाले की, परिशुद्ध आचरणातून अत्यंत प्रतिभावान पिढी घडवण्याचे सामर्थ्य केवळ एका पुरातन संस्कार शिबीरात असून, घरातील किमान एक तरी व्यक्ती अशा शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन महास्वामीजीं यांनी केले.

पूज्यश्री जडेय शांतलिंग महास्वामीजींचे कार्य बहुमोल असून सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन अक्कलकोट विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजीनी आशीर्वचनातून केले. डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी
शिबीरासाठी जागा उपलब्ध करून दिले.

या शिबीरास पूज्य श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले. या शिबीरास बोधक म्हणून लाभलेले प्रा.रामेश्वर बिज्जरगी, बसवराज भाईकट्टी, ॲड. मनोहर दुधगी, नागनाथ कोणदे, मनोज हत्ती, अभियंता कौशिक नाशी व बाळकृष्ण म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

शिबीराच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी अध्यक्ष उद्योजक बसवराज माशाळे, सचिव व माजी नगरसेवक कांतू धनशेट्टी, प्रमोद लोकापूरे, सागर हळगोदे, सुरेश पाटील, बाळकृष्ण म्हेत्रे, ओंकार लोकापूरे, अविनाश मंगरुळे, राजू मलंग, दत्तकुमार साखरे, राजू कलबुर्गी, सुनिल बिराजदार, ओंकार उटगे, प्रा.वीरभद्र मोदी यांच्यासह आदीजन परिश्रम घेतले. शनिवारी या शिबाराचा ‘समारोप व प्रमाणपत्र वितरण सोहळा’ पुज्य श्रींच्या दिव्य सानिध्यात पार पडला.

शिबीराच्या समारोप कार्यक्रमास अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सुविद्य पत्नी शांभवीताई कल्याणशेट्टी, समर्थनगर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. जयश्रीताई पाटील, माजी सरपंच प्रदीप पाटील, मा.नगरसेवक महेश हिंडोळे यांच्यासह अनेक मान्यवर,पालक, शिबीरार्थी व पंचक्रोशीतून दर्शनासाठी आलेले समाधान सद्भक्त मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण म्हेत्रे यानी केले तर दतकुमार साखरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button